ब्लेडने गळा कापून तरुणीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 17:12 IST2018-02-02T17:11:59+5:302018-02-02T17:12:17+5:30

कुरखेडापासून तीन किलोमीटर अंतरावर तळेगाव-धमदीटोला मार्गावरील रस्त्यालगतच्या जंगलात शुक्रवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एका अनोळखी तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Blade cut the throat and cut it off | ब्लेडने गळा कापून तरुणीचा खून

ब्लेडने गळा कापून तरुणीचा खून

कुरखेडा (गडचिरोली) :   कुरखेडापासून तीन किलोमीटर अंतरावर तळेगाव-धमदीटोला मार्गावरील रस्त्यालगतच्या जंगलात शुक्रवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एका अनोळखी तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिची ब्लेडने गळा कापून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृत तरुणीचे वय अंदाजे १७ ते १८ वर्षे आहे. तिचा गळा चिरलेल्या स्थितीत असून जवळच एक ब्लेडचे रिकामे कव्हर आढळले. त्यामुळे ब्लेडने गळा कापून तिची हत्या करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सदर तरुणीच्या अंगात काळा जीन्स, लाल टॉप व काळे जर्किन आहे. घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, ठाणेदार गजानन पडळकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेची माहिती पसरताच लगतच्या गावक-यांनी घटनास्थळी गर्दी केली, मात्र सायंकाळपर्यंत तिची ओळख पटू शकलेली नाही. जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल नाही. त्यामुळे ती तरूणी दुस-या जिल्ह्यातील असण्याची शक्यता आहे. ती महाविद्यालयात शिकणारी असावी आणि एखाद्या व्यक्तीसोबत ती त्या ठिकाणी आली असण्याची शक्यता आहे.

Web Title: Blade cut the throat and cut it off