शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

आरमोरी न.प.वर भाजपचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:45 IST

जिल्ह्यात गडचिरोली, देसाईगंजनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत भाजपचे पवन दिलीप नारनवरे यांनी ३८२० मते घेऊन परिवर्तन पॅनलचे विजय तुकाराम बगडे (३३२५ मते) यांचा ४९५ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे तेजस श्रीराम मडावी यांना २९४४ मते घेऊन तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदी पवन नारनवरे : भाजपचे ८ तर काँग्रेसचे ६ नगरसेवक विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जिल्ह्यात गडचिरोली, देसाईगंजनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत भाजपचे पवन दिलीप नारनवरे यांनी ३८२० मते घेऊन परिवर्तन पॅनलचे विजय तुकाराम बगडे (३३२५ मते) यांचा ४९५ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे तेजस श्रीराम मडावी यांना २९४४ मते घेऊन तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवकपदांवरही भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले. एकूण १७ पैकी ८ जागी भाजपचे तर ६ जागी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. काँग्रेस समर्थित भाकपा, तसेच शिवसेना आणि परिवर्तन पॅनलला प्रत्येकी एकाच जागेवर विजय मिळवणे शक्य झाले.अतिशय चुरसपूर्ण झालेल्या या निवडणुकीत आरमोरीचे पहिले नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यासोबतच नगरसेवक होण्यासाठीही अनेक जण रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसाठी महत्वपूर्ण होती. त्यातही आरमोरी मतदार संघात ही निवडणूक होत असल्याने भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांच्यासाठी तसेच सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार यांच्यासाठी जास्त महत्वाची मानली जात होती. याशिवाय याच मतदार संघातील माजी आमदार काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांच्यासाठीही प्रतिष्ठा आजमावणारी होती. त्यात भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले.रविवारी (दि.२७) झालेल्या मतदानानंतर लगेच सोमवारी (दि.२८) सकाळी १० वाजतापासून तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. आधी पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. पूर्ण निकाल हाती येताच नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार पवन नारनवरे आणि भाजपच्या विजयी उमेदवारांची खुल्या वाहनावरून मिरवणूक काढण्यात आली. या जीपवर आमदार कृष्णा गजबे, प्रकाश पारेड्डीवार, हैदर पंजवानी आदी भाजप नेतेही विराजमान होते.या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस सोबत आघाडी न करता काही जागा स्वतंत्र लढवल्या, पण त्यांना यश आले नाही.निवडणूक निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी डी.जी. नान्हे यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुरखेडाचे एसडीओ समाधान शेंडगे, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार यशवंत धाईत व मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली.नगरसेवक पदाचे विजयी व पराभूत उमेदवारप्रभाग क्रमांक - १ (अ)विजयी - गीता भुवनेश्वर सेलोकर (भाजप) - ६६१पराभूत - रोशनी राकेश बैस (काँग्रेस) - ५२९----------------------------प्रभाग क्रमांक - १ (ब)विजयी - भारत श्यामराव बावणथडे (भाजपा) - ७२९पराभूत - लाकेश कृष्णराव गारोदे (काँग्रेस) - ५७१----------------------------प्रभाग क्रमांक - २ (अ)विजयी - मिथून माणिकराव मडावी (भाजपा) - ६७१पराभूत - रवींद्र मारोती नैताम (काँग्रेस) - ६३३----------------------------प्रभाग क्रमांक - २ (ब)विजयी - सुनिता भोजराज चांदेवार (भाजपा) - ४८०पराभूत ज्योती सुनील खोब्रागडे (शिवसेना) - ३६७----------------------------प्रभाग क्रमांक - ३ (अ)विजयी - निर्मला अनिल किरमे (काँग्रेस) - ४८०पराभूत - ज्योती दीपक निंबेकर (भाजपा) - ४२१----------------------------प्रभाग क्रमांक - ३ (ब)विजयी - हैदर हुसेनभाई पंजवानी (भाजपा) - ४१४पराभूत - प्रमोद यादवराव सोमनकर (काँग्रेस) - ३४०----------------------------प्रभाग क्रमांक - ४ (अ)विजयी - सिंधू कवडूजी कापकर (भाकप) - ५४६पराभूत - पुष्पा अशोक वाघ (भाजपा) - ५३३----------------------------प्रभाग क्रमांक - ४ (ब)विजयी - मिलिंद मोरेश्वर खोब्रागडे (काँग्रेस) - ५४८पराभूत - पंकज जयकृष्ण खरवडे (भाजपा) - ४१६----------------------------प्रभाग क्रमांक - ५ (अ)विजयी - प्रशांत गंगाधर सोमकुंवर (शिवसेना) - ५९०पराभूत - जगदिश चंद्रभान मेश्राम (भाकप) - ४१८----------------------------प्रभाग क्रमांक - ५ (ब)विजयी - दुर्गा संजय लोणारे (काँग्रेस) - ५६४पराभूत - भाग्यश्री राजू कंकटवार (भाजप) - ८९३----------------------------प्रभाग क्रमांक - ६ (अ)विजयी - उषा भिमराव बारसागडे (काँग्रेस) - ७८७पराभूत - रसिका वसंत इंदूरकर (भाजपा) - ६०६----------------------------प्रभाग क्रमांक - ६ (ब)विजयी - विलास जगन्नाथ पारधी (भाजपा) - ५०६पराभूत - माणिक पंढरी भोयर (परिवर्तन पॅनल) - ४४२----------------------------प्रभाग क्रमांक - ७ (अ)विजयी - किर्ती शालिकराम पत्रे (काँग्रेस) - ४७३पराभूत - लक्ष्मी हरीष मने (शिवसेना) - ४४६----------------------------प्रभाग क्रमांक - ७ (ब)विजयी - प्रशांत मनोहर मोटवानी (काँग्रेस) - ५१०पराभूत - अभिमन्यू धर्माजी राऊत (भाजपा) - ४८४----------------------------प्रभाग क्रमांक - ८ (अ)विजयी - प्रगती प्रशांत नारनवरे (भाजपा) - ९६८पराभूत - पुष्पा विनोद घरत (परिवर्तन पॅनल) - ७९६----------------------------प्रभाग क्रमांक - ८ (ब)विजयी - सागर चंद्रशेखर मने (परिवर्तन पॅनल) - ७५१पराभूत - ज्ञानेश्वर बाळकृष्ण कुकुडकर (काँग्रेस) - ५९१----------------------------प्रभाग क्रमांक - ८ (क)विजयी - सुनिता रेवतीराम मने (भाजपा) - ८७०पराभूत - स्वाती दिवाकर पोटफोडे (काँग्रेस) - ७१०