गडचिरोलीत भाजपकडून रीना चिचघरे, काँग्रेसकडून कविता पोरेड्डीवार यांची उमेदवारी जाहीर ?

By संजय तिपाले | Updated: November 17, 2025 13:56 IST2025-11-17T12:59:12+5:302025-11-17T13:56:23+5:30

शेवटच्या क्षणापर्यंत चुरस : पक्षांतर्गत विरोधकांना आमदार नरोटे यांचा शह; ‘ए.बी.’ फॉर्मने उलगडले गुपित

BJP announces Reena Chichghare, Congress announces Kavita Poreddiwar's candidature in Gadchiroli | गडचिरोलीत भाजपकडून रीना चिचघरे, काँग्रेसकडून कविता पोरेड्डीवार यांची उमेदवारी जाहीर ?

BJP announces Reena Chichghare, Congress announces Kavita Poreddiwar's candidature in Gadchiroli

गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगरपालिकांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारीची मोठी उत्कंठा होती. नामांकन  दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जोरदार चुरस पाहावयास मिळाली. अखेर १७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेनंतर सूत्रे हलली अन् भाजप व काँग्रेसच्या ए.बी. फॉर्मनेच उमेदवारीचे गुपित उलगडले. गडचिरोली पालिकेसाठी भाजपने रीना सतीश चिचघरे तर काँग्रेसने कविता सुरेश पोरेड्डीवार यांना उमेदवारी दिली. 

गडचिरोली पालिकेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसंदर्भात भाजपमध्ये जोरदार चुरस होती. पक्षात उभे दोन गट उभे पडले होते, मात्र आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी संयमी खेळी खेळत रीना चिचघरे यांच्या पारड्यात उमेदवारी टाकून विरोधकांना शह दिल्याची चर्चा आहे.

गडचिरोलीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. उमेदवारीच्या स्पर्धेत भाजपमध्ये महिला पदाधिकाऱ्यांत जोरदार चुरस पाहायला मिळाली. भाजप महिला जिल्हाध्यक्षा व माजी नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे, भाजप जिल्हा महामंत्री गीता सुशील हिंगे, प्रणोती सागर निंबोरकर आणि रीना सतीश चिचघरे यांच्यात स्पर्धा होती. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर भाजपने रीना चिचघरे यांना संधी दिली. 

रीना चिचघरे त्या आधी एसबीआयच्या गडचिरोली जिल्हा शाखेत व्यवस्थापक होत्या. नोकरीचा राजीनामा देऊन त्या थेट राजकीय मैदानात उतरल्या, आणि नगराध्यक्षपदासाठी भाजपची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरल्या. त्यांचा सामना काँग्रेसच्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांच्याशी होणार आहे. कविता पोरेड्डीवार या गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार यांच्या पत्नी असून निवृत्त प्राचार्या आहेत.

भाजपच्या एका जागेचा तिढा कायम

गडचिरोली शहरात नगरसेवकपदाच्या २७ पैकी २६ जणांचे ए.बी. फॉर्म निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे , जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी उमेदवारांना दिले. एका जागेवरुन अद्याप तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात दोन प्रबळ दावेदारांशी प्रमुख नेत्यांची बंदद्वार चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेस ‘वंचित’सोबत हातमिळविण्याच्या तयारीत

दरम्यान, गडचिरोली पालिकेमध्ये सत्तेचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी सोयीनुसार युती, आघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने (अजित पवार गट) शिंदेसेनेसोबत आघाडी केली आहे तर राष्ट्रवादी (शरद पवार गट), उध्दवसेना व मनसे एकत्रित येण्याची शक्यता आहे. यासोबतच अखेरच्या दिवशी काँग्रेस   वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बोलणी सुुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आरमोरी, देसाईगंजमधील नावे गुलदस्त्यातच

आरमोरी व देसाईगंज पालिकेतील नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदावरुन पेच कायम आहे. त्यामुळे उमेदवारांची  नावे भाजप व काँग्रेसने अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दुपारी १ वाजेनंतर तेथे राजकीय हालचाली अधिक गतिमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title : गडचिरोली: भाजपा, कांग्रेस ने रीना चिचघरे, कविता पोरेड्डीवार को उम्मीदवार घोषित किया।

Web Summary : भाजपा ने गडचिरोली नगर पालिका चुनावों के लिए रीना चिचघरे को नामांकित किया, जबकि कांग्रेस ने कविता पोरेड्डीवार को मैदान में उतारा। भाजपा की चयन प्रक्रिया में आंतरिक प्रतिस्पर्धा देखी गई। कांग्रेस वंचित बहुजन अघाड़ी के साथ गठबंधन तलाश रही है। आरमोरी, देसाईगंज में अनिश्चितता बनी हुई है।

Web Title : Gadchiroli: BJP, Congress announce candidates Reena Chichghare, Kavita Porediwar for election.

Web Summary : BJP nominated Reena Chichghare, ex-banker, and Congress nominated Kavita Porediwar for Gadchiroli municipal elections. Internal competition marked BJP's selection process. Congress explores alliance with Vanchit Bahujan Aghadi. Uncertainty remains in Armori, Desaiganj.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.