शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले

By admin | Updated: March 12, 2015 02:00 IST

पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेले वैरागड येथील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले होते. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात किल्ल्याच्या तटा, बुरूजावरचे झाडे, झुडूपी तोडण्यात आले.

वैरागड : पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेले वैरागड येथील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले होते. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात किल्ल्याच्या तटा, बुरूजावरचे झाडे, झुडूपी तोडण्यात आले. मात्र निधी संपल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी पुरातत्व विभागाने पुरेसा निधी मंजूर करून उपलब्ध करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकमेव वैरागड येथे पुरातन किल्ला आहे. या किल्ल्याचे संरक्षण झाल्यास व त्याला मूळ स्वरूप प्राप्त झाल्यास पुढील पिढ्यांना किल्ल्याचे सौंदर्य न्याहाळता येईल. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या किल्ल्याचे सौंदर्यीकरण व्हावे, म्हणून शासन दरबारी अनेक प्रयत्न झाले. ब्रिटिश शासनाच्या काळात ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषितही झाले. मात्र त्यानंतर वैरागडच्या किल्ल्याच्या विकासासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. यंदा किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र निधी संपल्याच्या कारणावरून सौंदर्यीकरणाचे काम ठप्प पडले आहे.इ.स. १२ व्या शतकात चंद्रपूरचे तत्कालीन गोंड राजे बल्लाळशहाने वैरागडचा किल्ला बांधला. १२ एकरच्या जागेत पसरलेल्या किल्ल्याच्या चारही बाजुस तट आणि बुरूज आहे. किल्ल्याच्या आतील भागात राजाचा महाल होता. मात्र सदर महाल आता जमीनदोस्त झाला आहे. विविध आकाराच्या सात विहिरी किल्ल्यात आहेत. समोर मुख्य प्रवेशद्वार व बाहेर पडण्यासाठी मागील भागात एक दरवाजा आहे. १८ बुरूज एकत्र असलेला हा किल्ला उत्तम कारागिरीचा नमूना आहे. (वार्ताहर)