शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

५१ शेतकऱ्यांना बैलबंडीचे वाटप

By admin | Updated: November 15, 2014 01:40 IST

अहेरी पंचायत समिती, आदिवासी उपयोजना अंतर्गत ५१ लाभार्थ्यांना लोखंडी बंडीचे वितरण करण्यात आले. १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बैलबंडीचा लाभ देण्यात आला.

अहेरी : अहेरी पंचायत समिती, आदिवासी उपयोजना अंतर्गत ५१ लाभार्थ्यांना लोखंडी बंडीचे वितरण करण्यात आले. १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बैलबंडीचा लाभ देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवनी गावडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. कृषी सभापती अजय कंकडालवार, कृषी समिती सदस्य नंदा दुर्गे, पं. स. सदस्य, रामेश्वरबाबा आत्राम, सुखदेव दुर्याेधन, किष्टापूरचे सरपंच आत्माराम गद्देकर, वेलगुरचे उपसरपंच अशोक येलमुले, लालुजी करपेत उपस्थित होते. अहेरी पंचायत समितीतील ३० गावांना २०१३-१४ मध्ये मंजुर झालेल्या ११८ लोखंडी बैलगाड्यांपैकी ५१ बैलगाड्यांचा वाटप करण्यात आले आहे. यापैकी गडअहेरी, बाम्हणीतील ४ लाभार्थ्यांना बैलबंडी वितरीत करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा कृषी विकास अधिकारी राजपूत, कापसे, सवंर्ग विकास अधिकारी पी. चांदेकर उपस्थित होते. दरम्यान जि. प. सभापती अजय कंकडालवार यांचा पं. स. च्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी पी. पी. पदा यांनी केले. पदा यांनी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन हिवराज मेश्राम यांनी केले. यावेळी पं. स. तील कर्मचारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)