शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा शिक्षकांना शाळेत उपस्थितीची सक्ती करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST

काेराेनाने राज्यात भयानक रूप धारण केले असतानाही तप्त उन्हात सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील ...

काेराेनाने राज्यात भयानक रूप धारण केले असतानाही तप्त उन्हात सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील सर्व शिक्षक व कर्मचारी शाळेत उपस्थित राहतात. इयत्ता १० वी १२ वीची परीक्षा पुढे ढकलल्याने, तसेच उर्वरित वर्गांच्या परीक्षा रद्द झाल्याने आश्रमशाळांत एकही विद्यार्थी उपस्थित नाही. तरीही १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुरू आहे. शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी १६ एप्रिल राेजीच्या आदेशान्वये संचारबंदीच्या काळात सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती न करण्याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशान्वये जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांनीही सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना संचारबंदी कालावधीत शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करू नये, असे आदेश १६ एप्रिल राेजीच काढले आहे. असे असतानाही आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांतील मुख्याध्यापकांनी आदिवासी विकास विभागाचे आदेश नसल्याची बाब पुढे करून १०० टक्के शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थितीबाबत वेठीस धरल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर अन्याय हाेत आहे. यामुळे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष आहे.

आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या नागपूर विभागीय कार्यकारिणीने १८ एप्रिल राेजी नागपूर विभाग अपर आयुक्त व सर्व प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सक्ती न करण्याची मागणी संघटनेचे विभागीय अध्यक्ष आर. टी. खवशी, सचिव प्रा. अमृत मेश्राम, गडचिराेली जिल्हाध्यक्ष आर. एम. पत्रे, भंडारा व गाेंदिया जिल्हाध्यक्ष एस. डी. काेवे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण तुराणकर, नागपूर प्रकल्पाच्या अध्यक्ष के. बी. लांजेवार,चंद्रपूर प्रकल्प अध्यक्ष व्ही. यू. राेहणकर, गडचिराेली प्रकल्प अध्यक्ष के. व्ही. कुंडगीर, अहेरी प्रकल्प अध्यक्ष अमित नाईक, भामरागड प्रकल्प अध्यक्ष जे. डी. गजभिये, चिमूर प्रकल्प अध्यक्ष एम. एस. मेश्राम, वर्धा प्रकल्प अध्यक्ष आर. व्ही. गावंडे यांनी मागणी केली आहे.