अशोक नेतेंच्या विजयाचा जल्लोष

By Admin | Updated: May 17, 2014 00:15 IST2014-05-17T00:15:13+5:302014-05-17T00:15:13+5:30

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युवाशक्ती संघटना, नाविस युतीचे उमेदवार अशोक महादेवराव नेते हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून २ लाख ३६ हजार ८७0 मताधिक्यांनी निवडून आले.

Ashok Singh's victory is a victory | अशोक नेतेंच्या विजयाचा जल्लोष

अशोक नेतेंच्या विजयाचा जल्लोष

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युवाशक्ती संघटना, नाविस युतीचे उमेदवार अशोक महादेवराव नेते हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून २ लाख ३६ हजार ८७0 मताधिक्यांनी निवडून आले. त्यांच्या विजयाबद्दल महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.

अशोक नेते यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा दारूण पराभव केला. अपेक्षेपेक्षा प्रचंड मताधिक्यांनी अशोक नेते विजयी झाल्याने मोठय़ा जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. महायुतीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले.

अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, भामरागड व चामोर्शी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवार अशोक नेते यांच्यावर भ्रमणध्वनीच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला. अशोक नेते यांची विजयी मिरवणूक मुल मार्गावरील फवारा चौकापासून आठवडी बाजार परिसर, त्रिमूर्ती चौक, व्हाया इंदिरा गांधी चौकात पोहोचली. चौकातून अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीत भाजप, शिवसेना, युवाशक्ती व अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान शहरातील शेकडो नागरिकांनी हात हलवून त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Ashok Singh's victory is a victory