शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना अटक करा अन्यथा ६ पासून उपोषण

By admin | Updated: September 2, 2016 01:22 IST

आरमोरी तालुक्यातील देऊळगावनजीक इंजेवारी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या पशुवैकीय अधिकारी निलेश राठोड यांची पत्नी...

चव्हाण कुटुुंबीयांचा इशारा : किशोरी राठोड आत्महत्या प्रकरणगडचिरोली : आरमोरी तालुक्यातील देऊळगावनजीक इंजेवारी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या पशुवैकीय अधिकारी निलेश राठोड यांची पत्नी किशोरी उर्फ जान्हवी राठोड हिने ७ जुलै रोजी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. पती डॉ. निलेश रामसिंग राठोड व सासरकडील सदस्यांच्या छळाला कंटाळून किशोरीने आत्महत्या केली, अशी तक्रार किशोरीच्या आई-वडिलांनी आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणातील सर्वच सहा आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा ६ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार, असा इशारा मृतक किशोरी हिची आई ललिता मोहन चव्हाण यांच्यासह चव्हाण कुटुंबियांनी दिला आहे. या संदर्भात मृतक किशोरी राठोड हिची आई ललिता मोहन चव्हाण रा. कुंभारकिन्ही ता. दारव्हा जि. यवतमाळ यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हुंड्याच्या रक्कमेसाठी सासरच्या मंडळीकडून माझी मुलगी किशोरी उर्फ जान्हवी राठोड हिचा छळ करण्यात आला. छळ असह्य झाल्याने तिने आत्महत्या केली. या प्रकरणातील दोषी आरोपींवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश रामसिंग राठोड, रामसिंग हरी राठोड, सविता रामसिंग राठोड, अक्षय रामसिंग राठोड, शंकर आडे व विष्णू आडे यांना तत्काळ अटक करावी, असे त्यांनी म्हटले आहे.