शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

सात पदव्युत्तर विभागाच्या ७७ पदांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

सद्य:स्थितीत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाईड अर्थशास्त्र व मॉसकम्युनिकेशन आदी पदव्युत्तर विभागाचे वर्ग सुरू आहेत. एमए मराठी, एमबीए हे अभ्यासक्रम अनुदानाअभावी सद्य:स्थितीत बंद आहेत. गोंडवाना विद्यापीठ परिसरात रोजगार निर्माण करणारे तसेच आवश्यक मूलभूत पद्व्युत्तर अभ्यासक्रम असणे ही या भागाची गरज होती.

ठळक मुद्देगोंडवाना विद्यापीठ : ४९ प्राध्यापक व २८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी निर्माण झालेल्या येथील गोंडवाना विद्यापीठात गतवर्षीपासून नवीन सात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या सात पद्व्युत्तर विभागासाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून शासनाने एकूण ७७ पदांना मंजुरी प्रदान केली आहे.या संदर्भात राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १९ सप्टेंबर २०१९ रोजी नवा शासन निर्णय जारी केला आहे. येथील गोंडवाना विद्यापीठात जुने पाच पदव्युत्तर विभाग आहेत. गतवर्षीपासून नव्याने सात पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले आहे. यामध्ये संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाईड अर्थशास्त्र, एमए मराठी, एमबीए, एमए मॉसकम्युकेशन आदी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.सद्य:स्थितीत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाईड अर्थशास्त्र व मॉसकम्युनिकेशन आदी पदव्युत्तर विभागाचे वर्ग सुरू आहेत. एमए मराठी, एमबीए हे अभ्यासक्रम अनुदानाअभावी सद्य:स्थितीत बंद आहेत. गोंडवाना विद्यापीठ परिसरात रोजगार निर्माण करणारे तसेच आवश्यक मूलभूत पद्व्युत्तर अभ्यासक्रम असणे ही या भागाची गरज होती. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात नवीन सात रोजगाराभिमुख शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर पदे निर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. अखेर शासनाने सात अभ्यासक्रमासाठी एकूण ७७ पदांना मंजुरी प्रदान केली.एमएससी संगणकशास्त्र विषयाला चार सहायक प्राध्यापक, एमएससी भौतिकशास्त्राला चार, एमएससी रसायनशास्त्राला चार, एमए अप्लाईड अर्थशास्त्राला चार, एमए मराठीला चार, एमबीएला चार व एमए मॉसकम्युनिकेशन विषयाला चार अशा एकूण २८ सहायक प्राध्यापकांच्या पदनिर्मितीला शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. या शिवाय तांत्रिक अधिकारी, संगणक निरिक्षक, तांत्रिक सहायक, प्रयोगशाळा सहायक, निम्न श्रेणी लिपीक व प्रयोगशाळा परिचर आदी २८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.अनुदानासह मंजुरी मिळाल्याने प्रवेश वाढणारगोंडवाना विद्यापीठाने गतवर्षीपासून सात पद्व्युत्तर अभ्यासक्रम विनाअनुदान तत्वावर सुरू केले होते. परिणामी येथे तासिका तत्वावर प्राध्यापक नियुक्त करण्यात आले. शिवाय एमबीए, मॉसकम्युनिकेशन व इतर अभ्यासक्रमाची प्रवेशशुल्क, शिक्षण व इतर शुल्क संबंधित विद्यार्थ्याला १०० टक्के भरावी लागत होती. त्यामुळे अपेक्षित प्रवेश होत नव्हते. मात्र आता प्राध्यापकांच्या वेतनासह अभ्यासक्रमांना अनुदानासह मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेणे शक्य होणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ