शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

मतदार जनजागृतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 6:00 AM

जिल्ह्यात मतदार जनजागृतीबाबत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार स्वीप समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या कृती आराखड्यावर चर्चा झाली.

ठळक मुद्देमोहीत गर्ग : स्वीप समितीच्या बैठक कृती आराखड्यावर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदारांना निवडणुक प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे. यातूनच आपली लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होईल, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा स्वीप समितीचे सदस्य सचिव डॉ.मोहित गर्ग यांनी केले.जिल्ह्यात मतदार जनजागृतीबाबत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार स्वीप समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या कृती आराखड्यावर चर्चा झाली. यावेळी मे म्हणाले की, जास्तीत जास्त लोकांना मतदान प्रक्रिया व मतदान करण्याचे फायदे सांगावे लागतील. प्रत्येक विभाग व शाळा महाविद्यालयांचे योगदान या जनजागृती कार्यक्रमात महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक उपस्थित सदस्यांकडून विविध नियोजन व संकल्पना घेतल्या. विधानसभा निवडणुकासाठी आवश्यक प्रचार प्रसार साहित्य जिल्हा स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या अभियानात माध्यमांचे महत्वाचे स्थान आहे. पारदर्शक निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी माध्यमांनी मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगणे गरजेचे आहे.या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल रूढे, उप प्रदेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस. एच. पेंदाम, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक पी. एम. भोसले, नाबार्डचे डीडीएम आर. जी. चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम, जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिन अडसुळ, महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडंगे, सहा.स्वीप नोडल अधिकारी सागर पाटील, सदस्य कृष्णा रेड्डी व इतर अधिकारी उपस्थित होते.कलापथक, बॅनरद्वारे जागृतीया बैठकीत मतदार जनजागृतीबाबत बॅनर्स, पोस्टर्स, संकल्पपत्र, कलापथक कार्यक्रम, एसएमएस, विविध स्पर्धात्मक कार्यक्रम, प्रभात फेरी, रक्तदान शिबीर, गृहभेटी असे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. स्वीप समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत लेखी सूचना या अगोदर दिल्या आहेत. प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम व प्रक्रियेबाबत मतदारांना माहिती देण्यासाठी आवश्यक सुचना दिलेल्या आहेत.दुर्गम भागात जागृतीवर प्रशासनाचा भरदुर्गम व आदिवासी बहुल भागांमध्ये मतदानाची जागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. जागृतीनंतर या भागातील नागरिक मतदानाचा हक्क हमखास बजावितात.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019