शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडातील २० गावांमधील दारू हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:13 IST

कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दितील ४४ गावांपैकी २० गावात महिला मंडळांनी दारू बंदीचा निर्णय घेऊन .....

ठळक मुद्देमहिला मंडळांनी कंबर कसली : सततच्या धाडीमुळे त्रस्त झालेल्या दारू विक्रेत्यांनी सोडला व्यवसाय

सिराज पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दितील ४४ गावांपैकी २० गावात महिला मंडळांनी दारू बंदीचा निर्णय घेऊन त्याची कडक अंमलबजावणी करणे सुरू केल्याने या गावांमधील दारू हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कायद्याने जे जमले नाही ते येथील महिलांनी करून दाखविले आहे. यासाठी कुरखेडाचे ठाणेदार योगेश घारे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी कुरखेडा तालुक्यात या दारूबंदीचा प्रभाव कुठेच दिसून येत नव्हता. चोरी-छुप्या मार्गांनी दारूची आयात करून प्रत्येक गावात विक्री केली जात होती. अवैध दारू विकणाºया व्यक्तीला पोलीस गजाआड करीत होते. मात्र त्या व्यक्तीची लवकरच जामिनावर सुटका होते. जामिनावर सुटका झाल्याबरोबर पुन्हा दारू विक्रीचा व्यवसाय उघडतो. त्यामुळे दारूबंदीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे पोलिसांना आजपर्यंत तरी शक्य झाले नव्हते. गावातील दारूमुळे अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. कुरखेडा पोलीस स्टेशनचा प्रभार घेतल्यानंतर ठाणेदार योगेश घारे यांनी तालुक्यातील दारू हद्दपार करण्याचा निर्धार केला. गावागावात जाऊन महिला मंडळांच्या भेटी घेतल्या. महिलांना दारूमुळे होणारे जुने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समजावून सांगितला. महिलांनी पुढाकार घेतल्यास त्यांना पोलीस सहकार्य करतील. याबाबत विश्वास दर्शविला. त्यानंतर महिलांनी पुढाकार घेत दारूविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. हातभट्टी, दारू विक्री ठिकाणांवर धाडी घालण्यास सुरूवात केली. सातत्याने पडणाºया धाडींमुळे दारू विक्रेते त्रस्त झाले व त्यांनी दारू विक्रीचा व्यवसाय सोडला. काही गावातील मोहीम थंडावल्या होत्या. मात्र ठाणेदारांनी पुन्हा मार्गदर्शन करून दारू विक्रेत्यांच्या विरोधात मोहिमा उघडण्यास प्रोत्साहित केले. सद्य:स्थितीत कुरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया एकूण ४४ गावांपैकी २० गावांमध्ये पूर्णपणे दारूबंदी झाली आहे. कुरखेडा शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या वाकडी या गावात अवैध दारू विक्री सुरू होती. मात्र महिला मंडळाने धाड घालून संबंधित दारू विक्रेत्याला दम भरल्यानंतर दारू विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. यापूर्वी कठीण वाटणारी दारूबंदी यशस्वी होत आहे.पोलिसांचे महिलांना मार्गदर्शनकुरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गतच्या २० गावांमध्ये दारूबंदी झाली आहे. या दारूबंदीमध्ये महिलांचा पुढाकार आहे. मात्र या महिलांना कुरखेडा पोलिसांनी प्रोत्साहित केले आहे. एखाद्या ठिकाणी महिलांनी धाड टाकल्यानंतर पोलीस लगेच पोहोचत असल्याने महिलांचीही हिंमत वाढण्यास मदत झाली आहे.कुरखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच इतर ठाण्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे इतर ठाण्यानीही अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविल्यास दारूबंदीची अंमलबजावणी करणे कठीण होणार नाही.दारूबंदी मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता महिलांचा सहभाग अतिशय परिणामकारक ठरेल. याचा अंदाज आला होता. कारण या व्यसनाची सर्वाधिक झळ महिलांना बसते. महिलांच्या सहकार्याने दारूबंदीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ४४ गावांपैकी २० गावांमध्ये दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.- योगेश घारे, ठाणेदार, कुरखेडा