शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:46 IST

अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये अनेक आर्थिक व्यवहारांचे घोटाळे उघडकीस येऊनही

जि.प. उपाध्यक्षांवरही नाराजी : आश्वासन पाळले नसल्याचा आरोप प्रशांत ठेपाले   आलापल्ली अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये अनेक आर्थिक व्यवहारांचे घोटाळे उघडकीस येऊनही त्याची साधी चौकशी सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एक महिन्यापूर्वी आलापल्ली ग्राम पंचायतीची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत सदर ग्रामपंचायतीचे अनेक घोटाळे उघडकीस आले. यामध्ये प्रामुख्याने सचिवाने स्वत:च्या नावाने पैशाची उचल केली आहे. तर काही सदस्यांच्या नावे सुध्दा धनादेश वटविण्यात आले. तसेच यात काही ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने सुध्दा धनादेश देण्यात आले आहे. सदर रक्कम ही नेमकी कशासाठी देण्यात आली, याचा खुलासा ग्रामसभेत सचिवाला करता आला नाही. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार हे सुध्दा उपस्थित होते. आलापल्ली ग्राम पंचायतीच्या इतिहासात सर्वाधिक गाजलेली व रात्री उशिरापर्यंत चाललेली ही ग्रामसभा चर्चेचा विषय ठरली. याप्रसंगी उपस्थित असलेले जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना आलापल्ली येथे ग्राम विकास अधिकाऱ्याचे पद असून प्रभारी ग्रामसेवक आपल्या पदाचा गैरवापर करीत आहे. येथे ग्राम विकास अधिकारी नियुक्त करतो. तसेच ग्रामसभेमध्ये खर्चाचा हिशोब न लागल्याने त्यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला याची माहिती दिली. रेकॉर्ड जप्त करायला लावला. आलापल्लीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. मात्र महिना लोटला. परंतु कंकडालवार यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उल्लेखनिय बाब म्हणजे, आलापल्ली क्षेत्राचे प्रतिनिधीत्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार करीत आहेत, असे असताना ही परिस्थिती आहे. याचे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. आलापल्ली ग्राम पंचायतीच्या परिस्थितीमुळे सर्वच प्रकारचे विकासकामे अडलेले आहेत. १४ वा वित्त आयोग, पेसा अंतर्गत सर्व कामे ठप्प असून तेंदू लिलावही दोनवेळा रद्द करावा लागला. त्यामुळे या ग्राम पंचायतीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. ग्रा.पं.च्या कारभाराची चौकशी कुणी रखडविली ? अहेरी पंचायत समितीपासून सात किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड जप्त झाल्यापासून पंचायत समितीत चौकशीसाठी कोणीही आले नाही. ग्रामसभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडून एक महिन्याचा कालावधी लोटला. चौकशी करायला विलंब का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी महिनाभरापूर्वी दिलेले चौकशीचे आश्वासन सध्या हवेतच विरले आहे. तसेच गावात पाण्याची समस्याही भीषण प्रमाणात उद्भवली असून मागील आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे, असे असताना या समस्येकडेही जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे दुर्लक्ष झाले आहे.