शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

तीन वर्षात तंत्रनिकेतनच्या प्रवेशात २० टक्क्यांनी वृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षासाठी ३० जूनपासून ऑनलाईन नाेंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीय तंत्रनिकेतनने जिल्हाभर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षासाठी ३० जूनपासून ऑनलाईन नाेंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीय तंत्रनिकेतनने जिल्हाभर राबविलेल्या ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रमामुळे जिल्ह्यात ऑनलाईन नाेंदणीला विद्यार्थ्यांचा बराच प्रतिसाद लाभत आहे. २३ जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पडण्यासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने नंतरच विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित हाेणार आहे. परंतु गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात २० टक्क्यांनी प्रवेश क्षमतेत वृद्धी झाली.

विद्यार्थ्यांचा ओढा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे वळावा, यासाठी जिल्ह्यात स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मागील वर्षी तंत्रनिकेतनमधील ३७ मुलांना प्लेसमेंट मिळाली तर यावर्षी ३२ मुलांना मिळाली. तंत्रनिकेतनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राेजगार उपलब्ध करून दिला जात आहे.

बाॅक्स...

विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांकच नाही

- काेराेना लाॅकडाऊनमुळे यावर्षी इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा रद्द झाली. महाविद्यालयातर्फे विशिष्ट गुणांकन करून गुणदान केले जाणार आहे. आठवड्यात ऑनलाईन निकाल जाहीर हाेणार आहे. परंतु परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांक उपलब्ध नाही.

- ज्या विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांक उपलब्ध नाही, अशांना संबंधित शाळांशी संपर्क साधून बैठक क्रमांक घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांना ऑनलाईन निकाल पाहून तंत्रनिकेतनचा प्रवेश अर्ज भरता येईल.

बाॅक्स...

दहावीच्या निकालानंतर येणार गती

इयत्ता दहावीचा बाेर्डाचा निकाल लागल्यानंतरच विद्यार्थी ऑनलाईन नाेंदणी प्रक्रियेला वेग येणार आहे. तंत्रनिकेतनच्या माध्यमातून शाळांमध्ये तंत्रशिक्षण व राेजगाराबाबत जागृती केल्यामुळे यावर्षी तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

बाॅक्स...

गेल्या वर्षी ४० टक्के जागा रिक्त

गडचिराेली जिल्हा ग्रामीण व दुर्गम भागात विस्तारलेला आहे. तरीसुद्धा तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या २१०पैकी १११ जागा मागील वर्षी भरण्यात आल्या. जवळपास ६० टक्के जागा भरल्या हाेत्या, तर ४० टक्के जागा रिक्त हाेत्या. तीन वर्षांत ही प्रवेशवृद्धीच हाेती.

काेट...

गडचिराेली जिल्हा उद्याेगविरहीत आहे. त्यामुळे राेजगाराभिमुख शिक्षण घेऊनही परजिल्ह्यात राेजगारासाठी धाव घ्यावी लागते. जिल्ह्यात उद्याेगधंदे असते तर अधिकाधिक विद्यार्थी राेजगाराभिमुख शिक्षणाकडे वळले असते. तरीसुद्धा बरेच विद्यार्थी तंत्रशिक्षणाकडे वळत आहेत. परंतु दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन तंत्रशिक्षण घेणे अडचणीचे ठरते. अनेकदा आर्थिक परिस्थितीही शिक्षणाच्या आड येत असल्याने अडचणी येतात.

- विनाेद काेरेटी

.........

मागील दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय व राेजगार बुडाला. अनेकजण बेघर झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महागडे शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे आहे. शहरी भागातील विद्यार्थी तंत्रशिक्षण घेत असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला तंत्रशिक्षण घेणे सहज शक्य नाही. तंत्रशिक्षणासाठी बराच आर्थिक खर्च करावा लागताेे.

- धनंजय नागाेसे

.............

शासकीय तंत्रनिकेतनसाठी तीन ते चार टप्प्यात प्रवेश प्रक्रिया हाेणार आहे. गडचिराेली तंत्रनिकेतनमध्ये २१० प्रवेश क्षमता असून चार ब्रॅंच आहेत. सर्व ब्रॅंचमधील प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांना नाेंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेत सहभागी हाेता येईल. जिल्ह्यातील विद्यार्थी तंत्रनिकेतनकडे वळावेत, यासाठी स्कूल कनेक्ट कार्यक्रमाद्वारे जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रनिकेतनचे अधिकारी व कर्मचारी शाळांच्या माध्यमातून पाेहाेचले. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील शाळांचे मुख्याध्यापक व पालकांना तंत्रशिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीसुद्धा प्रवेशवृद्धी हाेईल, अशी अपेक्षा आहे.

- डाॅ. अतुल बाेराडे, प्राचार्य,

शासकीय तंत्रनिकेतन, गडचिराेली