शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार कृषी वीजपंप जोडा

By admin | Updated: May 3, 2015 01:08 IST

चांगल्या उगणवक्षतेचे बियाणे, योग्य वेळेत खत पुरवून सिंचनाच्या सूक्ष्म नियोजनाद्वारे ...

गडचिरोली : चांगल्या उगणवक्षतेचे बियाणे, योग्य वेळेत खत पुरवून सिंचनाच्या सूक्ष्म नियोजनाद्वारे २ हजार ९५१ कृषी वीजपंपाची जोडणी चालू आर्थिक वर्षात पूर्ण करून शेतकऱ्याच्या हिताचा प्राधान्यांने विचार करा, असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. आढावा बैठकीला खा. अशोक नेते, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार घावटे, नगराध्यक्ष निर्मला मडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुडमूलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम उपस्थित होते.महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने कृषी विजपंपांची जोडणी करण्याच्या सूचना अनेकदा देऊनही स्थानिक पातळीवर काम अद्यापही पूर्ण झाले नाही. या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून दंड आकारावा, तसेच ट्रान्सफार्मबाबत योग्य दक्षता घेऊन शेतकऱ्यांना वेळेत पिकांकरिता पाणी द्यावे, झालेल्या कामाची पाहणी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन करावी, तसेच पाण्याबाबत सूक्ष्म नियोजन करून बदलत्या वातावरणाचा अभ्यास करावा व शेतीला पाणी द्यावे. कॅनलची वेळीच दुरूस्ती करून पाणी निचरा होणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घ्यावी, पाणीवाटप संस्थांना विश्वासात घ्यावे, सौरऊर्जेद्वारे सिंचनाची योग्य सोय ज्या ठिकाणी करण्यात आली आहे, तेथील पंप सुस्थितीत करावे, अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक, सातत्याने विचारविनिमय करून सर्व कामे पार पाडावीत, अशा सूचनाही अम्ब्रीशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना अधिक उगवणक्षमता असलेली बियाणे उपलब्ध करून द्यावीत, खत पुरवठादारांनी नियमाप्रमाणे खताची विक्री करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुडमुलवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)