उपचारासाठी आलेल्या महिलेची परप्रांतीय डॉक्टरने काढली छेड; कुरखेडातील संतापजनक घटना
By संजय तिपाले | Updated: June 14, 2023 17:16 IST2023-06-14T17:16:05+5:302023-06-14T17:16:59+5:30
डॉक्टरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

उपचारासाठी आलेल्या महिलेची परप्रांतीय डॉक्टरने काढली छेड; कुरखेडातील संतापजनक घटना
गडचिरोली : मूळव्याधीच्या औषधोपचाराकरीता येथे आलेल्या एका विवाहित महिलेची छेड काढल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी एका परप्रांतीय खासगी डॉक्टरवरविनयभंगाचा गुन्हा नोंद केला. त्यास १४ जूनला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
जीबन हिरा असे त्या डॉक्टरचे नाव आहे. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानजीक त्याचा खासगी दवाखाना आहे. १३ जूनला तालुक्यातील खेडेगावातील एक महिला उपचारासाठी त्याच्या दवाखान्यात आली होती. यावेळी डॉ. जीबन हिरा याने वाईट हेतूने स्पर्श करुन विनयभंग केल्याचा आरोप तिने केला. याबाबत तिने कुरखेडा ठाणे गाठून फिर्याद दिली, त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. १४ रोजी आरोपी जीबन हिरा यास अटक करुन पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शीतल माने करीत आहेत.
वैद्यकीय क्षेत्र हादरले
दरम्यान, या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी डॉ.जीबन हिरा हा परप्रांतीय असून त्यास विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक झाल्याने महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.