दुचाकीची झाडाला धडक; शिक्षकाचा मृत्यू

By दिगांबर जवादे | Updated: June 21, 2023 20:25 IST2023-06-21T20:25:26+5:302023-06-21T20:25:44+5:30

दिगांबर जवादे गडचिराेली : कुरखेडावरून देसाईगंजकडे येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट झाडाला धडकली. यात शिक्षक दीपक शामराव पिल्लेवान ...

A bike hit a tree; Death of a teacher | दुचाकीची झाडाला धडक; शिक्षकाचा मृत्यू

दुचाकीची झाडाला धडक; शिक्षकाचा मृत्यू

दिगांबर जवादे
गडचिराेली :
कुरखेडावरून देसाईगंजकडे येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट झाडाला धडकली. यात शिक्षक दीपक शामराव पिल्लेवान यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. विसोराच्या बसस्थानकापासून देसाईगंज मार्गावर अवघ्या २०० मीटर अंतरावर सदर अपघात झाला.

कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक दीपक शामराव पिल्लेवान (४९) हे जागतिक योग दिननिमित्त शाळेत गेले होते. तिथून ते तहसील कार्यालय, कुरखेडा येथे बीएलओ म्हणून कामासाठी गेले. परत कुरखेडावरून देसाईगंजला येत हाेते. कुरखेडा- देसाईगंज या मार्गावरील विसोरा ते सीताबर्डी दरम्यान पिल्लेवान यांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. दुचाकीसह पिल्लेवान रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक देत शेतात पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि परिवार आहे.

Web Title: A bike hit a tree; Death of a teacher