शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह नऊ लाखांचा दारूसाठा पकडला

By admin | Updated: May 5, 2016 00:10 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जिल्हा दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वैरागड ते कुरखेडा मार्गावर

पथकाची कारवाई : वैरागड-कुरखेडा मार्गावर घटना; पाच दारूविक्रेत्यांना अटकआरमोरी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जिल्हा दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वैरागड ते कुरखेडा मार्गावर दारूची तस्करी करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून सहा दारूविक्रेत्या आरोपींकडून वाहनासह एकूण नऊ लाख दोन हजार रूपयांचा दारूसाठा पकडल्याची कारवाई बुधवारी केली.याप्रकरणी मुकेश दयाराम मुंगनकार (२३), भास्कर क्रिष्णा देशमुख (३४), तेजराम मनिराम बन्सोड (१८) तिघेही रा. सालेभट्टी ता. मानपूर जि. नांदगाव तसेच संजय दयाराम ठलाल (३५) रा. मुस्का ता. धानोरा, बुर्रा मलय्या, चिन्नू मलय्या दोघेही रा. डोंगरगाव ता. मानपूर जि. राजनांदगाव यांच्यावर आरमोरी पोलीस ठाण्यात मंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ अ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. भास्कर देशमुख, मुकेश मुंगनकार, तेजराम बन्सोड, संजय ठलाल हे चौघेजण मुकेश मुंगनकार यांच्या सीजी-०८-डब्ल्यू-२४०७ या चारचाकी वाहनाने गडचिरोली जिल्ह्यात विदेशी दारूसाठा आणून ते किरकोळ दारूविक्रेत्यांना देणार आहेत, अशी गुप्त माहिती पथकाच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पवार, ढवळे, उराडे, परिमल बाला, चवारे, छग्गीर, राठोड, साखरे, दुधलकर, पदा, मुंडे व तायडे यांनी वैरागड-कुरखेडा मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान कुरखेडाकडून वैरागडकडे येणाऱ्या सीजी-०८-डब्ल्यू-२४०७ या वाहनाला अडविले व या वाहनाची तपासणी केली. या वाहनातून २ लाख ५२ हजार रूपये किमतीच्या इंटेरिअल ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूचे २१ बॉक्स जप्त केले. तसेच ६ लाख ५० हजार रूपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त केले. वाहनासह एकूण नऊ लाख दोन हजार रूपयांचा दारूसाठा पकडला. विक्रमपुरातून आठ हजारांची मोहफूल दारू जप्तचामोर्शी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील मेघनाथ रवींद्र बिश्वास याच्या घरी धाड टाकून त्याचेकडून आठ हजार रूपये किमतीची एकूण ८० लिटर दारू जप्त केल्याची घटना मंगळवारी घडली. दारूविक्रेता आरोपी मेघनाथ बिश्वास याला अटक करून त्याचेवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये चामोर्शीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर कारवाई ठाणेदार किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस हवालदार श्यामराव वडेट्टीवार, रेमाजी धुर्वे, नामदेव दुधे, संजय चक्कावार, चित्रा तोरे यांनी केली.देसाईगंजात ५६ हजारांची दारू जप्तदारूबंदी पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी देसाईगंज शहरातील तुकूम वॉर्डात धाड टाकून दुचाकी वाहनासह एकूण ५६ हजार २०० रूपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी दारूविक्रेते आरोपी वामन सूर्यभान इंदुरकर (३८), शारदा देवानंद सहारे दोघेही रा. देसाईगंज यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. दारूचा पुरवठा करण्यासाठी दारूविक्रेत्यांनी वापरलेली एमएच-३३-एन-१६५७ ही दुचाकी जप्त केली.