८८.१२ हे.आर. जागा संपादित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:25 PM2018-11-18T22:25:20+5:302018-11-18T22:26:38+5:30

जिल्ह्यातील वडसा-गडचिरोली जिल्ह्यातील ५२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे. या रेल्वे मार्गासाठी ८८.१२५६ हेक्टर आर. जागा संपादित केली जाणार आहे.

88.12 O.R. The seats will be edited | ८८.१२ हे.आर. जागा संपादित होणार

८८.१२ हे.आर. जागा संपादित होणार

Next
ठळक मुद्देवडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग : भूसंपादन प्रक्रियेला वेग येणार; आक्षेपकर्त्यांच्या जमिनीची पुनर्मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : जिल्ह्यातील वडसा-गडचिरोली जिल्ह्यातील ५२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे. या रेल्वे मार्गासाठी ८८.१२५६ हेक्टर आर. जागा संपादित केली जाणार आहे. त्यामुळे सदर रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या प्रक्रियेला नव्याने वेग येणार आहे, अशी माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.
५ जानेवारी २०१६ च्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे लाईन करिता देसाईगंज उपविभागातील जमीन संपादन करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यालयाचे उद्घोषण क्रमांक कावि/उविअ/अका-२/२३६३/२०१७ दि.२५ सप्टेंबर २०१७ नुसार देसाईगंज उपविभागातील १६ गावातील ४३६ सर्व्हे नंबर व एकूण क्षेत्र ८८.१२५६ हेक्टर आर. खासगी जमीन वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे लाईन करिता वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने खरेदी करण्याकरिता उद्घोषना १४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. उद्घोषनामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जमिनीपैकी काही जमीनधारकांनी त्यांचे जमीन संपादन होत असलेल्या क्षेत्राबाबत उपरोक्त कार्यालयात आक्षेप नोंदविला होता. त्या अनुषंगाने आक्षेपकर्त्यांचे उपस्थितीत त्यांच्या जमिनीची पुनर्मोजणी करण्यात आली होती.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी देसाईगंज यांच्या उपविभागातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील शासन परिपत्रक २५ जानेवारी २०१७ च्या परिच्छेद ४ मध्ये नमूद असलेल्या पुनर्मोजणी केलेल्या संयुक्त मोजणी अहवालानुसार सुधारित परिशिष्ट २ मध्ये दर्शविल्या प्रमाणे नऊ गावातील आक्षेप होते. एकूण १६४ सर्व्हे नंबरच्या क्षेत्रामध्ये वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे लाईन करिता खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने खरेदी करण्याकरिता झालेल्या बदलाबाबतचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार जमीन खरेदीची प्रक्रिया पार पडणार आहे. याकामी प्रक्रिया सुरू आहे.
यापूर्वी १४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व सुधारित परिशिष्ट २ मध्ये नसणाºया सर्व्हे नंबरमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी सदर प्रतिनिधीस सांगितले.
पुराव्यासह तक्रार नोंदविण्याचे एसडीओंचे आवाहन
सुधारित परिशिष्ट-२ मधील जमिनीवर इतर कुणाचाही हक्क, हितसंबंध, बोजा, सोसायटी कर्ज, बँक कर्ज, गहाण, बक्षीस अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण किंवा भू.क्र.बाबत कोर्टात मालकीहक्क किंवा अनुषंगिक दाद मागितली असल्यास आणि कोणाची उजरतक्रार, आक्षेप असल्यास जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी देसाईगंज यांच्याकडे कागदपत्राच्या पुराव्यानिशी आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी केले आहे. विहीत मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित जमिनीवर कोणचीही तक्रार नाही, असे गृहित धरून संयुक्त मोजणीनुसार तलाठी अभिलेख व शोध अहवालानुसार जमिनीचे मालक हक्क निश्चित करून शेतजमिनीची खासगी वाटाघाटीने सरळ खरेदी करण्याची कारवाई करण्यात येईल व त्यानंतर शेतजमिनीच्या मालकी हक्क संबंधात अथवा इतर कोणत्याही बाबीसंबंधात काही वाद उपस्थित झाल्यास शासन जबाबदार राहणार असेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: 88.12 O.R. The seats will be edited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.