शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

७० नागरिकांनी केले रक्तदान

By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST

नाभिक समाज संघटना व संत नगाजी देवस्थान यांच्यावतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान सुमारे ७० नागरिकांनी

गडचिरोली : नाभिक समाज संघटना व संत नगाजी देवस्थान यांच्यावतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान सुमारे ७० नागरिकांनी रक्तदान केले. त्याचबरोबर इतरही अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.घटस्थापना करून संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी समारंभाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मधूकर सूर्यवंशी, मोतीराम सूर्यवंशी, संघटनेचे अध्यक्ष नामदेव कवडू फुलबांधे, खुशरंग शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिराला डॉ. पंकज सकीणलावार, थामदेव महागनवार, संदीप लांजेवार, मनोज कोपावार, क्रिष्णा सायरनवार आदी मान्यवर उपस्थित होते. संत नगाजी महाराज यांची जयंती केवळ धार्मिक कार्यक्रमांनीच साजरी न करता यानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे दरवर्षीच आयोजन करण्यात येते. यावर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आला. या शिबिराला समाजातील युवक, महिला व नाभिक समाजातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दर्शविला. सुमारे ७० रक्दात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नरेंद्र पोवनवार, विवेक महागमवार, सागर होकम, राकेश वाटेकर, सोमकांत कटुकार, सुधाकर कतलपवार, थामदेव महागनवार, संदीप लांजेवार, सचिन सूत्रपवार, रामचंद्र सायलवार, कृष्णा सायरनवार, विनोद मादेशवार, अल्का क्षीरसागर, सुरेंद्र नक्षिणे, महेश जेट्टीवार आदींनी रक्तदान केले. रक्तदानानंतर रक्तगट तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर बहुसंख्य नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांनी नागरिकांना चांगले व निरोगी आरोग्य राखण्यासाठी सल्ला दिला. काही नागरिकांना औषधोपचारही सुचविण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. पंकज सकीणलावार, निशाली भरणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वागुलकर, प्रमोद दशमुखे, बंडू कुंभारे यांनी रुग्णांची तपासणी केली. पुण्यतिथीनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोपालकाला केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव शेन्डे, देवीदास वाडेकर, मोतीराम सूर्यवंशी, मनोहर लांजेवार, रमेश नक्षीणे, खुशरंग शेन्डे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजाचे अध्यक्ष नामदेव शेन्डे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, समाजाचे आपल्यावर देणे आहे, हे देणे समाजकार्य करून फेडले पाहिजे, असे आवाहन केले. प्रास्ताविक संदीप लांजेवार, संचालन व आभार थामदेव महागनवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्यंकटेश कल्याणमवार, सुधाकर कतलपवार, रमेश भंडारे, हेमराज लांजेवार, गिरीधर कडुकर, योगेश लांजेवार, बाळा लांजेवार, दिलीप कौशिक, संजय कतलपवार, अरूण नक्षिणे, बाबुराव वनस्कर, पुंडलिक सूर्यवंशी, अनिल कडुकर, सुरेश फुलबांदे, नामदेव इजनकर, राजेश जामदाडे, नीलकंठ मेश्राम आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)