शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी नेता 'प्रभाकर'सह ७ जण ठार, थरारक युद्धात जवान दीपक मडावी झाले शहीद

By संजय तिपाले | Updated: February 6, 2026 20:15 IST

दोन दिवसांच्या धुमश्चक्रीत सी-६० कमांडोंचा थरार : मोठा शस्त्रसाठा जप्त , माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० चे कंबरडे मोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: छत्तीसगडच्या सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रणसंग्रामात पोलिसांच्या सी-६० कमांडोंनी मोठी कामगिरी बजावली आहे. गडचिरोली विभागीय कमिटीचा प्रभारी आणि २५ लाखांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी नेता प्रभाकर याच्यासह एकूण ७ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. मात्र, या थरारक युद्धात अहेरी तालुक्यातील मांड्रा गावचे सुपुत्र दीपक चिन्ना मडावी (३८) हे जवान शहीद झाले असून, एका जवानावर उपचार सुरू आहेत.

भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील घनदाट जंगलात माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० चे सदस्य तळ ठोकून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. ३ फेब्रुवारी रोजी उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली १४ सी-६० पथकांनी जंगलात कूच केली. ४ फेब्रुवारीला माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. कमांडोंनी चोख प्रत्युत्तर देत माओवाद्यांचा घेराव आवळला. घनदाट झाडी आणि डोंगराळ भागाचा फायदा घेत माओवाद्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण जवानांच्या जिद्दीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. मृत माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, प्रभाकर सारख्या जहाल नेत्यासह एकूण सात जणांचा खात्मा झाल्याने कंपनी क्र. १०चे कंबरडे मोडले असून पोलिस दलाच्या नोंदीनुसार आता केवळ दोनच माओवादी शिल्लक आहेत.

मोठा शस्त्रसाठा जप्त

या मोहिमेत पोलिसांनी माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले असून घटनास्थळावरून युद्धसदृश साहित्य जप्त केले आहे. यात०३ एके- ४७ रायफल्स,०१ एसएलआर रायफल,०१ .३०३ रायफल,मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिट्टू यांचा समावेश आहे.

शौर्याची पराकाष्ठा, जवान दीपक मडावींनी टिपले दोन माओवादी

सी-६० चे जवान दीपक चिन्ना मडावी (३८) यांनी या लढाईत अतुलनीय शौर्य गाजवले. दोन माओवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर, शत्रूची गोळी लागल्याने त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या निधनाने अहेरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दुसरे जवान जोगा मडावी यांच्या डोक्याला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे.

"आमच्या जवानांनी प्राणाची बाजी लावून हे ऑपरेशन फत्ते केले आहे. प्रभाकरसारखा बडा नेता मारला जाणे, हा माओवादी चळवळीला बसलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे."- नीलोत्पल , पोलिस अधीक्षक, गडचिरोली

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli: Maoist leader 'Prabhakar' killed, soldier Deepak Madavi martyred in clash.

Web Summary : In Gadchiroli, security forces killed 7 Maoists, including leader Prabhakar, in Abujmad forest. Soldier Deepak Madavi martyred during the operation. A large cache of arms was recovered. The operation is a major blow to Maoist activities in the region.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी