शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासावर ५.९५ टक्के खर्च

By admin | Updated: July 9, 2015 01:42 IST

सन २०१५-१६ या वर्षाचा जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा एकूण १५६ कोटी ९८ लाख रूपयांचा आहे.

तीन महिन्यात : जिल्हा वार्षिक योजना
गडचिरोली : सन २०१५-१६ या वर्षाचा जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा एकूण १५६ कोटी ९८ लाख रूपयांचा आहे. तेवढीच अर्थसंकल्पीय तरतूद असून १५६ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी जिल्हा विकासासाठी बीडीएसवर प्राप्त झाला. यापैकी सर्व यंत्रणेला ६९ कोटी ६८ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला. जुलै २०१५ अखेरपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत ४१४.७९ लाख रूपयांचा निधी खर्च झाला असून याची टक्केवारी ५.९५ आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्हा नियोजन समिती गडचिरोली २०१५-१६ या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १५६ कोटी ९८ लाख रूपयांचा नियोजन व विकास आराखडा तयार केला. राज्यशासनाकडून जिल्हा विकासाकरिता १५६ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी चालू वर्षात प्राप्त झाला. प्राप्त झालेला निधी जिल्हा नियोजन विभागाने संबंधित यंत्रणेला त्या-त्या प्रमाणात वितरित केला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राअंतर्गत पीक संवर्धन, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, वने, सहकार, वृद व जलसंधारण आदी उपक्षेत्रांना मिळून एकूण ३६५७.४१ लक्ष रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यापैकी जिल्हा नियोजन विभागाने या उपक्षेत्रांना १५८२.२५ लक्ष रूपयांचा निधी वितरित केला. यापैकी या क्षेत्रांनी विकासावर आतापर्यंत १६६.२१ लक्ष रूपयांचा खर्च केला असून याची टक्केवारी १०.५० आहे.
ग्रामविकास क्षेत्राच्या ग्रामीण रोजगार व एकात्मिक ग्रामीण विकास क्षेत्रांसाठी संबंधित यंत्रणेला एकूण ४२२.१५ लक्ष रूपयांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र या क्षेत्राअंतर्गत अद्याप एकही रूपयांचा खर्च झाला नाही. सामाजिक न्याय व सामुहिक सेवा क्षेत्राअंतर्गत सामान्य शिक्षण, उच्च शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कला व संस्कृती, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा व स्वच्छता, नगरविकास मागासवर्गीयांचे कल्याण, महिला व बालविकास आदी उपक्षेत्रांना एकूण मंजूर नियतव्यापैकी २५५५.०६ लक्ष रूपयांचा निधी वितरित करण्यात आला. यापैकी तीन महिन्यांच्या कालावधीत १९४.३९ लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला असून याची टक्केवारी ७.६१ आहे. पाटबंधारे व पूर नियंत्रण विभागाला ८८९.५७ लक्ष रूपयांचा निधी चालू वर्षात देण्यात आला. यापैकी ५२.४७ लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला असून याची टक्केवारी ५.९० आहे.
बिगर गाभा क्षेत्राअंतर्गत उद्योग व खाणकाम उपक्षेत्राला एकूण ८४.०९ लक्ष रूपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. तेवढ्याच निधीची अर्थसंकल्पीय तरतूद असून प्रत्यक्ष बीडीएसवर ८४.०९ लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी जिल्हा नियोजन विभागाने ५२.५० लक्ष रूपयांचा निधी संबंधित यंत्रणेकडे वितरित केला. यापैकी तीन महिन्यांत १.६२ लाख रूपयांचा निधी खर्च झाला असून याची टक्केवारी ३.०९ आहे. एकूण बिगर गाभा क्षेत्राच्या खर्चाची तीन महिन्यांची टक्केवारी ०.११ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
आदिवासी व समाजकल्याण विभाग निधी खर्चात लेटलतिफ
राज्य शासनाकडून आदिवासी उपयोजनेंतर्गत गडचिरोली, अहेरी व भामरागड प्रकल्पाला आदिवासींच्या योजनांसाठी व विकास कामांसाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण २२२ कोटी ६७ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील विकास कामांसाठी २ कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी विभागाकडे वितरित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष समाजकल्याण विभागाला अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत २६ कोटी १३ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन विभागाने आदिवासी व समाजकल्याण या दोन्ही विभागाला निधी वितरित केला आहे. मात्र या दोन्ही विभागाकडून ई-निविदा प्रक्रियेच्या कामात दिरंगाई होत असल्याने निधी खर्चात दोन्ही विभाग लेटलतीफ आहेत.