नवदाम्पत्याच्या कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात 5 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:32 IST2021-11-25T10:14:00+5:302021-11-25T10:32:49+5:30

प्राप्त माहितीनुसार, सुरजागडवरून लोहदगड घेऊन ट्रक (क्रमांक ओडी 09, एच 0056) येत असताना गडचिरोलीवरून आलापल्लीकडे एक नवदाम्पत्य कारने (क्रमांक एमएच 33, व्ही 6018) जात होते

5 injured as truck collides head on in gadchiroli | नवदाम्पत्याच्या कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात 5 जखमी

नवदाम्पत्याच्या कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात 5 जखमी

मुलचेरा (गडचिरोली) : ट्रक आणि भरधाव कारची समोरासमोर टक्कर होऊन कारमधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री मूलचेरा तालुक्यातील लगाम येथे घडला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

प्राप्त माहितीनुसार, सुरजागडवरून लोहदगड घेऊन ट्रक (क्रमांक ओडी 09, एच 0056) येत असताना गडचिरोलीवरून आलापल्लीकडे एक नवदाम्पत्य कारने (क्रमांक एमएच 33, व्ही 6018) जात होते. लगाम येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. त्यामध्ये 5 जण जखमी झाले असून दोघांना गंभीर दुखावत झाली आहे. या कारमध्ये गडचिरोली येथील सुमित गंधेवार (वय 28), त्यांची पत्नी रिया गंधेवार (वय 25) या दाम्पत्यासह त्यांच्या मित्राची पत्नी व त्यांची दोन मुले असे एकूण 5 जण प्रवास करत होते. दरम्यान, जखमीना लगेच उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

 

Web Title: 5 injured as truck collides head on in gadchiroli