शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोकन्यायालयात ४९ प्रकरणे निकाली

By admin | Updated: April 9, 2017 01:30 IST

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात दाखलपूर्व प्रकरणांकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.

२३ लाख रूपयांची वसूली : न्यायालय परिसरात नागरिकांची गर्दी गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात दाखलपूर्व प्रकरणांकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या लोकअदालतीत ४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. देशातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याकरिता संपूर्ण देशात शनिवारी ८ एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक महाअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही करण्यात आली. राष्ट्रीय महालोक न्यायालयात १८ लाख ४५ हजार रूपयांची एकूण १९ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली. तसेच ४ लाख ६८ हजार ३७३ रूपयांची ३० दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढली. असे एकूण २३ लाख १३ हजार ३७३ रूपयांची ४९ प्रकरणे निकाली काढले आहेत. प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यू. एम. पदवाड यांच्या नियंत्रणाखाली दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ता. के. जगदाळे यांच्या देखरेखीखाली लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश वर्ग २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सु. तु. सूर यांनी पॅनल क्रमांक १ चे प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ता. के. जगदाळे यांनी पॅनल क्रमांक २ चे प्रमुख म्हणून काम पाहिले. सह दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी सु. म. बोमीडवार यांनी पॅनल क्रमांक ३ चे काम पाहिले. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी वकील मंडळी, न्यायालयातील कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. महालोक अदालतीत एकाच दिवशी प्रकरणे निकाली काढतात. त्यामुळे वेळ, पैसा, श्रम वाचण्यास मदत होते. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने महालोक अदालतीत प्रकरणांची संख्या वाढत आहे. (नगर प्रतिनिधी)