'लाल दहशती'ची ४४ स्मारके एकाच दिवसात जवानांनी केली जमीनदोस्त ! दक्षिण गडचिरोलीत माओवाद्यांना दणका

By संजय तिपाले | Updated: February 18, 2026 19:02 IST2026-02-18T18:59:14+5:302026-02-18T19:02:51+5:30

Gadchiroli : माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक आणि त्यांच्या हिंसक चळवळीची साक्ष देणारी जिल्ह्यातील तब्बल ४४ माओवादी स्मारके १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने जमीनदोस्त केली.

44 monuments of 'Red Terror' demolished by soldiers in a single day! Maoists dealt a blow in South Gadchiroli | 'लाल दहशती'ची ४४ स्मारके एकाच दिवसात जवानांनी केली जमीनदोस्त ! दक्षिण गडचिरोलीत माओवाद्यांना दणका

44 monuments of 'Red Terror' demolished by soldiers in a single day! Maoists dealt a blow in South Gadchiroli

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक आणि त्यांच्या हिंसक चळवळीची साक्ष देणारी जिल्ह्यातील तब्बल ४४ माओवादी स्मारके १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने जमीनदोस्त केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेद्वारे माओवादी चळवळीच्या उरल्यासुरल्या अस्तित्वावर पोलिसांनी मोठा प्रहार केला असून, दुर्गम भागातील जनतेला दहशतीच्या छायेतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

​दुर्गम आणि अतिदुर्गम भागात आपले अस्तित्व दाखविण्यासाठी आणि ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी माओवाद्यांकडून ठिकठिकाणी दगडी व सिमेंटची स्मारके उभारली जात होती. मात्र, बुधवारी पोलिसांनी या 'दहशतीच्या खाणाखुणा' पुसून काढण्यासाठी १८ पथके तैनात केली होती. यामध्ये सी-६०, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या सुमारे ८०० जवानांचा समावेश होता.

​बीडीडीएस पथकाकडून तपासणी 

‎​कोणतीही स्मारके उध्वस्त करण्यापूर्वी माओवाद्यांनी तिथे आयईडी किंवा स्फोटके पेरली असण्याची शक्यता गृहीत धरून १६ बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस ) पथकांनी परिसराची कसून तपासणी केली. पूर्णपणे खात्री पटल्यानंतरच ही स्मारके पाडण्यात आली.

​कुठे किती स्मारके पाडली? (उपविभागनिहाय)
‎​
‎​एटापल्ली: १८ स्मारके
‎​हेडरी: १७ स्मारके
‎​भामरागड: ०५ स्मारके
‎​जिमलगट्टा: ०२ स्मारके
‎​धानोरा : ०१ स्मारक 
‎पेंढरी: ०१ स्मारक

​दहशतीचे बालेकिल्ले ढासळले!

‎​माओवाद्यांचे अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा (जां.) यांसारख्या गावांमध्ये ही स्मारके तोडण्यात आली. ही केवळ बांधकामे नसून माओवाद्यांच्या हिंसक विचारांचा प्रचार करणारी केंद्रे होती. ती नष्ट झाल्यामुळे आता या भागातील ग्रामस्थांमध्ये सुरक्षेचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

Web Title : गढ़चिरौली: सुरक्षा बलों ने नक्सल विरोधी अभियान में 44 माओवादी स्मारकों को ध्वस्त किया

Web Summary : गढ़चिरौली पुलिस और सीआरपीएफ ने एक ही दिन में 44 माओवादी स्मारकों को ध्वस्त कर दिया। पुलिस अधीक्षक नीलोत्पल के नेतृत्व में यह अभियान दूरदराज के इलाकों में माओवादी आतंक के प्रतीकों पर लक्षित था। बम निरोधक दस्तों ने विध्वंस से पहले सुरक्षा सुनिश्चित की। इस कदम का उद्देश्य माओवादी प्रभाव को खत्म करना और ग्रामीणों में विश्वास पैदा करना है।

Web Title : Gadchiroli: Security Forces Demolish 44 Maoist Memorials in Anti-Naxal Push

Web Summary : Gadchiroli police and CRPF demolished 44 Maoist memorials in a single day. The operation, led by Superintendent Nilotpal, targeted symbols of Maoist terror in remote areas. Bomb disposal squads ensured safety before demolition. The move aims to dismantle Maoist influence and instill confidence among villagers.