शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

आधारसाठी ४१ स्थायी केंद्र

By admin | Updated: August 29, 2016 02:19 IST

आधार नोंदणीच्या कामाला गती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिर घेण्याबरोबरच तालुकास्थरावर स्थायी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

नागरिकांसाठी सोयीचे : ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजनगडचिरोली : आधार नोंदणीच्या कामाला गती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिर घेण्याबरोबरच तालुकास्थरावर स्थायी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हाभरात एकूण ४१ स्थायी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. २०११ च्या जनगणेनुसार गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लाख ३८ हजार ६२८ एवढी आहे. यापैकी जवळपास ९५ टक्के नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. तरीही जवळपास पाच टक्के नागरिकांनी आधारकार्ड अजूनपर्यंत निघालेले नाही. दुर्गम भागातील अनेक नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी शिबिरात सुद्धा येत नाही. त्यामुळे या नागरिकांचे आधारकार्ड अजूनपर्यंत निघाले नाही. तर काही गावांमध्ये आधारकार्ड काढण्याचे शिबिर सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या गावांमधील नागरिक अजूनही आधारकार्डपासून वंचित असल्याचे दिसून येते. प्रत्येक योजनेसाठी आधारकार्ड सक्तीचा करण्यात आला असल्याने प्रत्येक नागरिकाकडे आधारकार्ड असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून आधारकार्ड काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला सहा वर्षांखालील बालकांचे आधारकार्ड काढले जात नव्हते. आता मात्र याही मुलांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली आहे.१५ मार्च २०१६ च्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील १ लाख १ हजार ९४० बालके आहेत. त्यापैकी ९१ हजार १६६ बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. आधारकार्ड काढण्याचे प्रमाण ८९.४३ टक्के एवढे आहे. शाळा, महाविद्यालय सुरू झाले आहेत. अंगणवाडीत शिकणारे विद्यार्थी, आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी व २५ टक्के प्रवेशित विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर सदर आधारकार्ड काढण्याच्या कामाला आणखी वेग आला आहे. मात्र याच कालावधीत आणखी काही मुलांची भर पडली असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)