शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी ३५ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:03 IST

शेतकºयांचे थकलेले कर्ज माफ करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देसेतू केंद्रांवर गर्दी वाढली : जवळपास ७० टक्के शेतकºयांनी केली आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकºयांचे थकलेले कर्ज माफ करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत २६ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरातील ३५ हजार २५० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत मुदत निश्चित केल्याने केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी उसळत आहे. जवळपास ७० टक्के शेतकºयांचे अर्ज भरून झाले असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली आहे.कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे सक्तीचे करण्यात आले होते. आॅनलाईन अर्ज भरण्याला सुरूवात झाल्यानंतर काही दिवस मंत्रा डिव्हाईस उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे शेतकºयांना अर्जच भरता आले नाही. त्यानंतर मात्र अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. जुलै महिन्यात रोवणीची कामे सुरू होती. मात्र शासनाने शेवटची मुदत निश्चित केली नव्हती. कधीही अर्ज करण्याची मुदत संपून जाईल, अशी भिती शेतकºयांना असल्याने शेतीचे काम सोडून सेतू केंद्रात सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शेतकरी बसून राहत होते. अनेक केंद्रांमध्ये अजुनही शेतकºयांच्या रांगा लागलेल्याच आहेत. ग्रामपंचायत स्तरावरही अर्ज भरता येत असले तरी ग्रामपंचायतीने मात्र पुढाकार घेतला नाही. त्यामुळे सेतू केंद्रांवरच गर्दी उसळली असल्याचे दिसून येत आहे. जवळपास ७० टक्के शेतकºयांचे अर्ज भरून झाले असल्याचा अंदाज शेतकºयांनी व्यक्त केला आहे.पीक कर्ज माफ योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी १ एप्रिल २००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज ३० जून २०१६ पर्यंत थकीत आहे अशा शेतकºयांचे मुद्दल व व्याजासह १ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे. दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजनेअंतर्गत दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. नियमित कर्ज भरणाºयांनाही काही प्रमाणात प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे.बँकांचेही काम सुरूबँकांनाही १६६ कॉलम असलेला फॉरमॅट शासनाने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये संबंधित शेतकºयाची माहिती बँका भरत आहेत. संबंधित शेतकºयाने भरलेला अर्ज व बँकांनी भरलेला फॉरमॅट या दोघांचेही आॅडीट केले जाणार आहे. त्यानंतर सदर शेतकºयाचे नाव पुन्हा तालुकास्तरावरील समितीकडे तपासणीसाठी जाणार आहे. तालुका समितीच्या निर्णयानंतर संबंधित शेतकरी पात्र आहे किंवा नाही, हे ठरविले जाणार आहे. त्यामुळे नेमके किती शेतकरी पात्र ठरणार आहेत, हे अजुनही गुलदस्त्यातच आहे.सहा दिवसांपासून अर्ज भरण्याचे काम ठप्पमागील सहा दिवसांपासून बºयाच केंद्रांवर शेतकºयांच्या आधार कार्डासाठी अंगठ्याचे ठस्से स्वीकारले जात नसल्याने अर्ज भरण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यातच आता शासनाने १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख घोषीत केली आहे. त्यामुळे शेतकºयांची घालमेल वाढली असल्याचे दिसून येत आहे. दिवसभर शेतकरी केंद्रात बसून सायंकाळी निराश होऊन घराकडे परत जात आहे.मृतक शेतकºयांचे अर्ज भरताना अडचणआॅनलाईन अर्ज भरण्यासाठी संबंधित शेतकºयाचा आधार कार्ड व त्याच्या वेरिफिकेशनसाठी त्याचा थम्ब हा महत्त्वाचा घटक आहे. मृतक शेतकºयाचा आधार कार्ड असला तरी त्याचा थम्ब नसल्याने सदर शेतकºयाचा अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे. याबाबत शासनाने कोणतेही स्पष्ट निर्देश दिले नसल्याने जवळपास दोन हजार मृत शेतकºयांचे अजुनही अर्ज भरण्यात आले नाही.संबंधित शेतकºयावर सोसायटीचे कर्ज असल्यास त्या शेतकºयाचे कर्ज त्याच्या वारसदाराच्या नावाने रूपांतरीत केले जात आहे.