शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
3
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
4
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
5
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
6
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
7
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
8
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
9
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
10
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
11
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
12
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
13
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
14
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
15
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
16
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
17
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
18
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
19
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
20
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

३५ लाख ८५ हजारांच्या खताची विक्री थांबविली

By admin | Updated: July 26, 2015 02:45 IST

खरीप हंगामात खत व बियाण्यांचे काळाबाजार तसेच निकृष्ट बियाण्यांची विक्री रोखण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने धडक कृती कार्यक्रम तयार केला...

तपासणीत अनियमितता : चामोर्शी तालुक्यात भेंडाळा व आष्टी येथे कारवाई
गडचिरोली : खरीप हंगामात खत व बियाण्यांचे काळाबाजार तसेच निकृष्ट बियाण्यांची विक्री रोखण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने धडक कृती कार्यक्रम तयार केला असून जिल्ह्यात १२ तालुक्यात १३ पथक तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत कृषी केंद्रांची तपासणी करून कारवाई केली जात आहे. शुक्रवारी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा व आष्टी येथील दोन कृषी केंद्रात ३५ लाख ८५ हजार ६७६ रूपयांच्या रासायनिक खताची विक्री थांबविण्याचे आदेश चामोर्शी पं. स. चे कृषी विस्तार अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक पी. पी. राऊत यांनी दिले आहे.
जि. प. चे कृषी विकास अधिकारी एस. टी. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पं. स. चे कृषी विस्तार अधिकारी पी. पी. राऊत यांनी शुक्रवारी भेंडाळा येथील देवीकिशन कृषी केंद्र व आष्टी येथील विनोद कृषी केंद्रात धाड टाकून तपासणी केली. दरम्यान दोन्ही कृषी केंद्रात अनियमितता आढळून आली. त्यामुळे राऊत यांनी रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन झाल्या प्रकरणी सदर दोन्ही कृषी केंद्र परवानाधारकांना ३५ लाख ८५ हजार ६७६ रूपये किंमतीच्या रासायनिक खत विक्रीच्या बंदीचे आदेश दिले आहेत.
भेंडाळा येथील देवीकिशन कृषी केंद्रात विहीत नमुन्यातील अभिलेखे न ठेवणे, निरीक्षणाकरिता आलेल्या खत निरीक्षकांना खतांची माहिती व अभिलेखे उपलब्ध करून न देणे, वैध उगम प्रमाणपत्र न जोडता रासायनिक खताची खरेदी व विक्री करणे याबाबी तपासणीदरम्यान आढळून आल्या. रासायनिक खत नियंत्रण आदेशातील तरतुदीचे उल्लंघन झाल्यामुळे संबंधित कृषी केंद्र संचालकाला एकूण ११ लाख ७१ हजार १७४ रूपये किंमतीच्या खतविक्री थांबविली आहे. यामध्ये एसएसपी २६.३५ मेट्रिक टन, कृषी उद्योग ३० मेट्रिक टन, युरिया ३३.४ मेट्रिक टन, १८:१८:१० मनिरत्न ६.७५ मेट्रिक टन, २०:२०:००:१३ नावाचे ४.२ मेट्रिक टन व एमओपी २.४५ मेट्रिक टन खताचा समावेश आहे.
आष्टी येथील विनोद कृषी केंद्रात तपासणीदरम्यान वैध उगम प्रमाणपत्र न जोडता रासायनिक खताची खरेदी व विक्री करणे, साठा पुस्तक, पावती पुस्तक याचा ताळमेळ न जुडणे आदी बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे या कृषी कें द्रातील एकूण २४ लाख १४ हजार ५०० रूपये किंमतीच्या खताची विक्री थांबविण्याचे आदेश संबंधित कृषी केंद्र संचालकाला देण्यात आले आहे. विक्री थांबविलेल्या खतामध्ये युरिया १८.५ मेट्रिक टन, एसएसपी ५३ मेट्रिक टन, २०:२०:००:१३ नावाचे १३.७५ मेट्रिक टन, कृषी उद्योग १८.५ मेट्रिक टन, १६:१६:१६ आयपीएल ६० मेट्रिक टन आदी खतांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)