शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांसाठी ३ कोटी ९० लाख प्राप्त

By admin | Updated: May 29, 2016 01:31 IST

राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गडचिरोली

४ हजार २०७ शेतकऱ्यांनी केले अर्ज : ८०० शेतकऱ्यांना अनुदान पुरणारगडचिरोली : राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला यंदा १ हजार ३४० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. राज्य शासनाकडून या शेततळ्याच्या अनुदानासाठी गडचिरोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला ३ कोटी ९० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून एकूण ४ हजार २०७ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. अत्यल्प पाऊस व रखडलेले सिंचन प्रकल्प यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. गतवर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले. या दुष्काळ परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना दिलास देण्यासाठी भाजपप्रणीत राज्य सरकारने यावर्षीपासून मागेल त्याला शेततळे ही योजना हाती घेतली आहे.सिंचन क्षेत्र वाढावे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यांसाठी राज्य शासनाकडून एकूण ३ कोटी ९० लाख रूपये पहिल्या टप्प्यात कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ३६ लाख ५० हजार, धानोरा तालुक्यासाठी ३६ लाख ५० हजार, चामोर्शी ४३ लाख ५० हजार, मुलचेरा २९ लाख, देसाईगंज १५ लाख, आरमोरी ३७ लाख, कुरखेडा ३५ लाख, कोरची २९ लाख, अहेरी ४० लाख ५० हजार, एटापल्ली ४० लाख ५० हजार, भामरागड २३ लाख ५० हजार व सिरोंचा तालुक्यातील शेततळ्यांसाठी २३ लाख ५० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी सदर निधी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे. ३ कोटी ९० लाख रूपयांच्या या निधीतून ८०० शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रूपये यानुसार अनुदान मिळणार आहे. या निधीतून जिल्ह्यात जवळपास ८०० शेततळ्यांचे काम पूर्ण होणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)