शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

२९१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे२५६९ सदस्यांची होणार निवड : एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.मध्ये आचारसंहिता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायतींपैकी २९१, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५६९ ग्रामपंचायत सदस्य आणि २९१ सरपंचांची निवड करण्यासाठी येत्या २९ मार्च रोजी मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी सांगितले. ३० मार्च रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ही आचारसंहिता शिथिल होणार आहे.निवडणूक होणार असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक ७५ ग्रामपंचायती चामोर्शी तालुक्यातील, ६१ ग्रामपंचायती धानोरा तालुक्यातील तर ५१ ग्रामपंचायती गडचिरोली तालुक्यातील आहेत. त्यातून अनुक्रमे ५४१, २७८ आणि ३१७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. भामरागड तालुक्यात एकाही ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होणार नाही.विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्य आणि सरपंचांच्या जागा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातच उतरत नाहीत. दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या दबावामुळे निवडणूक लढण्यास कोणी तयार नसते. यावेळी या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारांना उभे करून रिक्त असलेल्या आणि होणाऱ्या जागा भरण्यात प्रशासनाला किती यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमनिवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २७ फेब्रुवारी रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. दि.६ ते १३ मार्च यादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. दि.१६ ला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. दि.१८ ला दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. त्यांतर रिंगणात कायम असलेल्या सदस्यांसाठी दि.२९ मार्च रोजी मतदान होईल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि.३० ला मतमोजणी होणार आहे.यावेळी इच्छुकांची संख्या वाढणार?जातीच्या प्रमाणपत्रांअभावी अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहात होते. मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणी शिबिरे घेऊन जात प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत