शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
2
Top Marathi News Live Updates: मंत्री नितेश राणे पायी चालत कॅबिनेट बैठकीसाठी हजर, इंधन बचतीचा नवा आदर्श
3
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
4
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
5
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
6
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
7
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
8
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
9
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
10
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
11
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
12
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
13
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
14
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
15
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
16
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
17
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
18
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
19
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
20
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

२७ जोडप्यांना धनादेशाचे वितरण

By admin | Updated: July 29, 2015 01:45 IST

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्या २७ जोडप्यांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेश वितरित करण्यात आले.

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन : समाजकल्याणकडे ४७ जोडप्यांची नोंदणी
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्या २७ जोडप्यांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेश वितरित करण्यात आले.
सदर धनादेश वितरणाचा कार्यक्रम मंगळवारला जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे होते. उद्घाटन जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, अप्पर मुख्य कार्यकारी व्ही. एस. मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी. बी. राऊत, जि.प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे, अशोक इंदूरकर, लैजा चालुरकर तसेच प्रभारी समाज कल्याण अधिकारी आर. के. कोलते, समाज कल्याण निरिक्षक आर. पी. खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर धनादेश वितरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. जि.प.च्या समाज कल्याण विभागाकडे २०१० पासून ते जून २०१५ पर्यंत ४७ आंतरजातीय विवाहित जोडप्यांची नोंदणी झाली. यापैकी मंगळवारी आयोजित धनादेश वितरण कार्यक्रमाला २७ जोडपी उपस्थित होते. २०१० मध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या राधा संतोष बावणे या जोडप्याला १५ हजार तर इतर २६ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जि.प. रोहयोचे गट विकास अधिकारी एस. टी. पडघन यांनी केले. या कार्यक्रमाला आंतरजातीय विवाह केलेली जोडपी उपस्थित होती. (स्थानिक प्रतिनिधी)

जोडप्यांना ५० हजाराचे धनादेश वाटप
जि.प. समाज कल्याण विभागातर्फे २६ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यामध्ये पूजा निखिल चव्हाण, कांचन श्रीनिवास मगडीवार, सविता सुनील भट्टलवार, नमिता स्वरूप माझी, वैशाली प्रफुल अंबादे, कविता सुशील नगराळे, लक्ष्मी नरेश मडावी, अस्मिता धनराज चौधरी, सरिता भिमा मंडीगेम, छाया महेश बामणवाडे, रोशनी संतोष येमनुरवार, वीणा पंकज दुबे, प्रियंका मुर्लीधर वाटगुरे, ज्योत्स्ना श्यामसुंदर कोसरे, पल्लवी श्रीकांत भिमनपल्लीवार, माधुरी सुनील मेश्राम, शारदा निवेश टेंभुर्णे, सारिका उमेश उईके, प्राजक्ता आशिष गुरनुले, सोनाली पंकज राऊत, वर्षा पराग मसराम, मीनाक्षी ज्ञानेश्वर वालदे, जीवनकला शंकर सडमेक आदींचा समावेश आहे.