शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विहीरगावात पकडले २० लाखांचे सागवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आरमोरी तालुक्यातील विहीरगाव येथे शेतातील सागाच्या झाडांची कंत्राटदारामार्फत कापणी करून ते तलावाजवळ लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार   वडसा वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय वायभासे (भावसे) यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम आणि वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने विहीरगाव येथे धाड टाकली.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : वनविभागाकडून कुठलीही परवानगी न घेता कंत्राटदारामार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान अवैधरीत्या  कापून लपवून ठेवलेले सागवान  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विहीरगाव येथे छापा टाकून पकडले. या कारवाईत २० ते २५ लाखांचे सागवान लठ्ठे जप्त केले. शुक्रवारी दुपारी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. वडसा वनविभागातील अलीकडच्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आरमोरी तालुक्यातील विहीरगाव येथे शेतातील सागाच्या झाडांची कंत्राटदारामार्फत कापणी करून ते तलावाजवळ लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार   वडसा वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय वायभासे (भावसे) यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम आणि वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने विहीरगाव येथे धाड टाकली.या प्रकरणी लाखनी येथील कंत्राटदार, त्याचे पाच मजूर व चार शेतकऱ्यांवर भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सदर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या कारवाईत वन अधिकाऱ्यांना क्षेत्र सहायक सोनुले, राजेंद्र कुंभारे, एम. गाजी शेख, वनरक्षक कमलेश गिन्नलवार, जनबंधू यांनी सहकार्य केले.

६२ मोठ्या वृक्षांची झाली कटाईसदर शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून चौकशी केली असता चार शेतकऱ्यांच्या शेतातील सागाच्या  ६२ मोठ्या वृक्षांची कटाई झाल्याचे निदर्शनास आले. शेतात कापलेल्या सागाचे खुंट दिसत होते, मात्र झाडांचे लठ्ठे कापणी केलेल्या ठिकाणी  नव्हते. त्यामुळे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबविली असता विहीरगावाजवळील तलावाच्या पाळीवर १४५ लठ्ठे  लपवून ठेवल्याचे दिसले.  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ते जप्त केले. 

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झाडांची कापणी करायची असल्यास वनविभागाची रीतसर परवानगी घ्यावी. परवानगी न घेता  कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कुठल्याही झाडाची  कापणी करू नये.- धनंजय वायभासेसहायक वनसंरक्षक, वडसा वनविभाग

 

टॅग्स :forest departmentवनविभाग