शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

१६५ नळ कनेक्शन कापले

By admin | Updated: April 6, 2017 01:22 IST

मागील अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकविलेल्या १६५ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापण्याची कारवाई नगर परिषदेने केली आहे.

नगर परिषदेची कारवाई : ५१.२० टक्के पाणीपट्टी वसूल; मोहीम सुरुच राहणार गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकविलेल्या १६५ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापण्याची कारवाई नगर परिषदेने केली आहे. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे पाणीपट्टी थकीत ठेवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. गडचिरोली शहरात एकूण ६ हजार ४८३ नळ कनेक्शन आहेत. शहरातील ७ पाणीटाक्यांच्या माध्यमातून दररोज सकाळी व सायंकाळी ६३ लाख लीटर पाणीपुरवठा केला जातो. नगर परिषदेच्या वतीने इतर शहरांच्या तुलनेत गडचिरोलीवासीयांना पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाते. पाणीपुरवठ्यावर दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च केला जातो. पाणीपुरवठ्यावर झालेला खर्च कराच्या माध्यमातूनच गोळा करून तो भागवावा, असे शासनाचे सक्त निर्देश आहेत. पाणीपट्टीची रक्कम सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यातच नागरिक भरतात. मात्र नगर परिषदेला पाणीपुरवठ्यावर वर्षभर खर्च करत राहावा लागतो. कोणत्याही परिस्थितीत पाणीपट्टी कराची वसुली ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाली पाहिजे, असे सक्त निर्देश नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र पथक तयार करून पाणीपट्टीची वसुली फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्यात पाणीपट्टी भरण्याविषयीच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही काही नागरिकांनी पाणीपट्टीचा भरणा केला नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या पाणीपट्टी वसुली पथकाने १६५ नागरिकांच्या नळांचे कनेक्शन कापले आहेत. कनेक्शन कापून पाणीपुरवठा बंद झाल्याबरोबरच यातील बहुतांश नागरिक दुसऱ्याच दिवशी पाणीपट्टी भरत असल्याचा अनुभव नगर परिषदेच्या पथकाला आला आहे. पाणीपट्टी भरल्यानंतर त्याच दिवशी नगर परिषदेचे कर्मचारी नळ कनेक्शन पुन्हा जोडून देत आहेत. कर वसुली पथकाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने मागील आठ दिवसांपासून नळ कनेक्शन कापण्याची मोहिमच हाती घेतली आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीलाही गती आली आहे. (नगर प्रतिनिधी) मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर प्रतिमाह २ टक्के व्याज आकारणार गडचिरोली नगर परिषदेची मालमत्ता कराची एकूण मागणी ३ कोटी ९६ लाख ८२ हजार ४२२ रूपये एवढी आहे. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत ३ कोटी १८ लाख ९० हजार ५०९ रूपयांची वसुली झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८०.३६ टक्के एवढे आहे. मार्चनंतर कर भरणाऱ्यांवर प्रतिमाह २ टक्के कर आकारण्याचे निर्देश नगर विकास विभागाने नगर परिषदांना दिले आहेत. त्यानुसार एप्रिलमध्ये कर भरणाऱ्यावर २ टक्के, मे मध्ये ४ टक्के, जूनमध्ये ६ टक्के, जुलैमध्ये ८ टक्के अशी दंडात्मक आकारणी करण्यात येणार आहे. ३१ मे पर्यंत चालणार मोहीम नगर परिषदेची पाणीपट्टीची वार्षिक मागणी १ कोटी ९१ लाख ६४ हजार १३८ रूपये एवढी आहे. त्यापैकी ९८ लाख १३ हजार ५९५ रूपयांची पाणीपट्टी वसुली झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ५१.२० टक्के एवढे आहे. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार ९० टक्क्यांपर्यंत वसुली करायची असल्याने पाणीपट्टी वसुलीसाठी नळ कनेक्शन कापण्याची मोहीम ३१ मे पर्यंत चालविली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. गडचिरोली शहरवासीयांना पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न नगर परिषद नेहमीच करीत आहे. ५० हजार लोकसंख्येच्या शहराला नियमितपणे दरदिवशी दोनवेळा पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच तत्काळ तक्रारीचे निवारण नगर परिषदेच्या मार्फतीने केले जाते. पाणी शुद्धीकरण, वीज, कर्मचारी यांच्यावर नगर परिषदेचे वर्षाला लाखो रूपये खर्च होतात. हा सर्व खर्च कराच्या माध्यमातूनच भागवावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी वेळीच पाणीपट्टी कर भरून नगर परिषदेला सहकार्य करावे. - कृष्णा निपाने, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली