शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १३५३ वीज ग्राहक झाले महावितरणच्या थकबाकीतून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

गडचिरेाली जिल्ह्यातील कृषिपंपधारकांकडून आजपर्यंत भरल्या गेलेल्या ८३ लाख १२ हजार रुपयांच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९ हजार हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९  हजार असे एकूण ५४ लाख ७८ रूपये कृषिग्राहकांच्या गडचिराेली जिल्ह्यातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत.

ठळक मुद्देगडचिराेलीतील ८३ लाख १२ हजार रुपयांचा केला भरणा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०  अंतर्गत कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्या योजनेतून गडचिरोली‍ जिल्ह्यातील २१ हजार ४१९ ग्राहकांपैकी १ हजार ३५३ ग्राहकांनी ८३ लाख १२ हजार रुपयांचा भरणा करुन थकबाकीमुक्तिची वाट धरली.गडचिरेाली जिल्ह्यातील कृषिपंपधारकांकडून आजपर्यंत भरल्या गेलेल्या ८३ लाख १२ हजार रुपयांच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९ हजार हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९  हजार असे एकूण ५४ लाख ७८ रूपये कृषिग्राहकांच्या गडचिराेली जिल्ह्यातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत.नागपूरचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील  २९ उपविभागांतर्गत  जनमित्र, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांचेसाेबत कृषी वीज धोरण २०२०, कृषिपंप वीजबिलाची वसुली आणि अकृषक थकबाकी वसुलीबाबत  थेट संवाद साधला. तसेच विविध ग्रामपंचायती अंतर्गत कृषीपंपधारकांचे मेळावे घेत कृषिपंपधारकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले. या  आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोलीतील ४४ कृषी ग्राहकांनी ३ लक्ष ६६ हजार रुपयाचा भरणा करून कृषी वीजबिल थकबाकी मुक्त झाले.  गडचिरोली मंडल अंतर्गत आलापल्ली विभागातील सिरोंचा उपविभागीय कार्यालय अंतर्गत शानगोंडा  गावात पंचायत समिती सदस्य प्रभाकर शानगोंडा, माजी सरपंच ताला वेंकना,पानते मलाय्या व शेतकरी यांच्या समक्ष मेळाव्यात ३५ कृषी ग्राहकांनी ११ लक्ष रुपये भरून कृषी विजबिल थकबाकी मुक्त झाले.  

गडचिराेली श्हरातील एका ग्राहकाचा पुढाकारगडचिरोली विभागातील ग्राहक चंद्रहास भुसारी यांनी एकाचवेळी १ लाख् ३९ हजार रक्कम भरुन थकबाकीमुक्तिची कास घरली. अनेक ग्राहकांनी या योजनेस प्रतिसाद देत मोठया रक्कमेचे कृषीपंपाचे वीजबिल भरले आहे. अशा सर्व ग्राहकांचा महावितरणद्वारा कृतज्ञता व्यक्त करीत सत्कार करण्यात येत आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या  वीज कर्मचारी याचाही सत्कार करण्यात येत आहे.

 

टॅग्स :electricityवीज