शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीत अडकले १०७ कर्ज प्रकरणे

By admin | Updated: March 11, 2015 00:01 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत विविध जिल्हा कार्यालयामार्फत यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

गडचिरोली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत विविध जिल्हा कार्यालयामार्फत यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली येथील संबंधित महामंडळाच्या कार्यालयाने मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडून मंजूर करून घेतलेले १०७ कर्ज प्रकरणे अडकली आहेत. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही कर्ज उपलब्ध झाले नसल्याने लाभार्थ्यांची प्रचंड अडचण होत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत लघू उद्योगासाठी दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या बारा पोटजातीतील नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत पाच महिन्यांपूर्वी मादगी समाजातील नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आली. १३६ नागरिकांनी कर्ज योजनेकरिता महामंडळाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात अर्ज सादर केले. जिल्हा कार्यालयाने कर्ज प्रकरणाचे सदर प्रस्ताव मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविल्यानंतर छाणनीअंती मुख्य कार्यालयाने १०७ नागरिकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली. मंजूर झालेल्या मादगी समाजातील नागरिकांना लघू व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रूपये कर्ज वितरित करणे आवश्यक आहे. मधल्या काळात निधीची अडचण होती. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनी आपल्या कार्यकाळात नियमबाह्यरित्या कर्ज प्रकरणे निकाली काढून कर्जाचे वितरण केल्याची तक्रार एका इसमाने मुख्य कार्यालयाकडे केली. त्यामुळे जुन्या कर्ज वाटप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पूर्ण होईपर्यंत कर्ज मंजूर झालेल्या नव्या लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप होणार नसल्याचे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडून लाभार्थ्यांना सांगितले जात असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)