शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१०० बोगस सीबीएसई पॅटर्न शाळा

By admin | Updated: June 27, 2015 01:48 IST

दिल्ली येथील सीबीएसई बोर्डाची मान्यता नसतानाही अनेक शाळा सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली जिल्ह्यात अभ्यासक्रम ...

दिलीप दहेलकर गडचिरोलीदिल्ली येथील सीबीएसई बोर्डाची मान्यता नसतानाही अनेक शाळा सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली जिल्ह्यात अभ्यासक्रम चालवित असून अशा शाळा १०० हून अधिक आहेत. पालकांकडून भरमसाठ शुल्क घेऊन अनेक खासगी संस्था पालकांची सर्रास लूट करीत आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत. २८ मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक तर २७७ माध्यमिक शाळा आहेत. मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमांच्या ११ माध्यमिक शाळा आहेत. सीबीएसई बोर्डाची शासनाकडून मान्यता असलेल्या जिल्ह्यात दोन शाळा आहेत. सीबीएसई बोर्डाची मान्यता नसलेल्या इयत्ता पहिली ते चौथी व पहिली ते सातवीच्या जिल्ह्यात २२ शाळा आहेत. यामध्ये कुरखेडा तालुक्यात एक, देसाईगंज दोन, आरमोरी दोन, चामोर्शी चार, गडचिरोली एक, अहेरी तीन, मुलचेरा दोन, सिरोंचा दोन, एटापल्ली तीन व धानोरा तालुक्यात दोन शाळांचा समावेश आहे. या २२ शाळांना सीबीएसई बोर्डाकडून इन्डेक्स नंबर मिळाला नसल्याची माहिती आहे. इंग्रजी माध्यमांच्या राज्यशासनाच्या मान्यताप्राप्त जिल्ह्यात एकूण ७० प्राथमिक शाळा आहेत. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक बाबीकायमविना अनुदानित तत्वावर इंग्रजी तसेच मराठी माध्यमांची शाळा सुरू करण्यासाठी धर्मदाय आयुक्ताकडून संस्थेला तीन वर्ष पूर्ण व्हावेत, संस्थेचा तीन वर्षांचा आॅडीट, संस्थेच्या मालकीची एक एकर जागा अथवा भाडेतत्वावर जागा घेण्यासाठी ३० वर्षांची लीज असावी, पहिली ते पाचवी वर्गापर्यंतच्या शाळेकरिता संस्थेची बँकेत पाच लाख रूपये फिक्स डिपॉझीट तर इयत्ता १२ वीपर्यंतच्या शाळेकरिता संस्थेला पाच लाख रूपये डिपॉझीट करणे आवश्यक आहे. जागेची लीज घेताना दुय्यम निबंधकाकडून करारनामा प्रमाणित असावा आदी बाबी आवश्यक आहेत.ग्रा.पं. ठरावावरच अनेक पूर्वप्राथमिक शाळाइंग्रजी माध्यमांच्या केजी १, केजी २ अभ्यासक्रमाच्या शाळांना जिल्हा परिषदेचा प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षण विभाग मान्यता देत नाही. संबंधित गावातील ग्रामपंचायत ठरावावरच दीडशेवर केजी अभ्यासक्रम चालविणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत. या शाळेतूनही पालकांची शुल्कापोटी आर्थिक लूट होत आहे.