शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार ८७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

By admin | Updated: June 5, 2015 01:35 IST

२०१५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे तसेच कीटकनाशकांसाठी ऐनवेळी धावपळ करावी लागू नये, ...

कृषी केंद्रात उपलब्ध : जि. प. च्या कृषी विभागाची खरीप हंगामाची तयारी पूर्ण
गडचिरोली : २०१५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे तसेच कीटकनाशकांसाठी ऐनवेळी धावपळ करावी लागू नये, या हेतूने जि. प. च्या कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. जि. प. कृषी विभागाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला भात, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद व किड आदी पिकांच्या दहा हजार ८७.०३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
जि. प. च्या कृषी विभागाने भात, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद व तीळ आदी पिकांच्या बियाण्यांच्या मागणीचे नियोजन केले आहे. १७ हजार ५४ क्विंटल सार्वजनिक व १२ हजार ६५७.५० क्विंटल खासगी प्रणालीद्वारे नियोजन केले आहे. कृषी आयुक्तालयाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याला वरील सर्व पिकांचे आठ हजार ५४७ क्विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर केले आहे. यापैकी सार्वजनिक प्रणालीमार्फत तीन हजार २१९ क्विंटल व खासगी प्रणालीमार्फत सहा हजार ८६८.०३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याला भात पिकाच्या नऊ हजार ८४३.८५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. सोयाबीन २४० क्विंटल, तूर ३० किलो, कापूस २.८८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)