फिफा विश्वचषकातून इराण बाहेर पडणार? अमेरिका-इस्रायल संघर्षाचा फुटबॉलला फटका; इराक किंवा यूएईला मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 05:01 IST2026-03-04T05:01:28+5:302026-03-04T05:01:49+5:30

FIFA World Cup 2026: इराण-अमेरिका युद्धामुळे फिफा विश्वचषक २०२६ मध्ये इराणच्या सहभागावर टांगती तलवार आहे. अमेरिकेने व्हिसा नाकारल्यास किंवा इराणने माघार घेतल्यास इराक किंवा यूएईला वर्ल्डकपचे तिकीट मिळू शकते.

World Cup Football: Will Iraq team kick after Iran's defeat? The impact of war in the Middle East | फिफा विश्वचषकातून इराण बाहेर पडणार? अमेरिका-इस्रायल संघर्षाचा फुटबॉलला फटका; इराक किंवा यूएईला मिळणार संधी

फिफा विश्वचषकातून इराण बाहेर पडणार? अमेरिका-इस्रायल संघर्षाचा फुटबॉलला फटका; इराक किंवा यूएईला मिळणार संधी

जिनिव्हा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या अमेरिकेच्या पुढाकारानंतर मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाची तीव्रता वाढल्यामुळे तीन महिन्यांनी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत इराणचा सहभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत इराणच्या जागी इराक किंवा संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांना संधी दिली जाऊ शकते.

इराणला विश्वचषकात साखळी फेरीतील ‘ग’ गटात तिन्ही सामने अमेरिकेत खेळायचे आहेत. अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. तसेच, इराणने २०२२ विश्वचषकाचे यजमान कतार व सौदी अरेबियासह अमेरिकेच्या सहयोगी देशांवरही क्षेपणास्त्र डागले. 

आशियाई फुटबॉल महासंघाचे उपाध्यक्ष व इराणचे वरिष्ठ फुटबॉल अधिकारी मेहदी ताज म्हणाले की, ‘या हल्ल्यानंतर आम्ही विश्वचषकातील सहभागाबाबत सकारात्मकतेने पाहू शकत नाही.’ विश्वचषकासाठी इराण आपला संघ पाठवणार की नाही किंवा अमेरिकन सरकार त्यांना प्रवेश देईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इराक थेट प्रवेश करणार?
आशियाई पात्रता फेरीत इराक आणि यूएई अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर होते. इराकने प्लेऑफमध्ये यूएईचा पराभव केला होता आणि विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी या संघाला ३१ मार्च रोजी बोलिव्हिया किंवा सुरिनामविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळविल्यास इराक विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळवेल. तसेच, पराभव झाला आणि इराणने माघार घेतली, तर इराकला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते.

Web Title: World Cup Football: Will Iraq team kick after Iran's defeat? The impact of war in the Middle East