शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डो, मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिले नाहीत, 'या' खेळाडूने पटकावला मान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 10:04 IST

जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलला दिला जाणाऱ्या बॅलोन डी ओर पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली.

ठळक मुद्देख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची मक्तेदारी संपुष्टातदहा वर्षांनंतर बॅलोन डि,ओर पुरस्कार नव्या खेळाडूच्या हातीक्रोएशियाच्या ल्युका मॉड्रिचने घडवला इतिहास

माद्रिद : जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलला दिला जाणाऱ्या बॅलोन डी ओर पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली. गेली दहा वर्षे रोनाल्डो आणि मेस्सी यांनी आलटून पालटून हा पुरस्कार स्वतःकडे ठेवला होता. मात्र, मंगळवारी या दोन्ही दिग्गज खेळाडूंना क्रोएशिया संघाचा कर्णधार ल्युका मॉड्रिचकडून धक्का बसला. 2018 चा बॅलोन डी ओर पुरस्कारावर मॉड्रिचच्या नावाची मोहोर उमटली. त्याने 277 गुणांच्या फरकाने हा पुरस्कार जिंकला आणि अशी कामगिरी करणारा तो क्रोएशियाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. ॲडा हिगेर्बर्ग हीच्या रुपात महिलांमध्येही नवीन नाव मिळाले. मॉड्रिचने 753 गुणांसह वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे रोनाल्डो ( 476) आणि ॲंटोइने ग्रिझमन (414) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदारांत आघाडीवर असलेल्या कायलिन मॅबाप्पेला 347 गुणांसह चौथ्या स्थानावर रहावे लागले. मेस्सीला केवळ 280 गुण मिळाली. मॉड्रिचसाठी हे वर्ष अविस्मरणीय राहिले. त्याने विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल, युएफाचा सर्वोत्तम खेळाडू, फिफाचा सर्वोत्तम खेळाडू आणि आता बॅलोन डि ओर अशे पुरस्कार पटकावले. फुटबॉल इतिहासात एकाच वर्षात हे चारही पुरस्कार जिंकणारा मॉड्रिच पहिलाच खेळाडू ठरला. मागील दहा वर्षांत रोनाल्डो आणि मेस्सी यांचे वर्चस्व होते. 2007 मध्ये बॅलोन डि ओर जिंकणारा काका हा या दोघांव्यतिरिक्त अखेरचा खेळाडू होता. या कालावधीत दोघांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार नावावर केला. मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. जेतेपदाच्या सामन्यात फ्रान्सने 4-2 अशा फरकाने क्रोएशियाची स्वप्नवत वाटचाल रोखली."हा पुरस्कार स्वीकारतानाच्या भावनांना कोणत्याही शब्दात मांडू शकत नाही. हा अनुभव अत्यंत सुखदायी आहे. याचे श्रेय संपूर्ण संघाला आहे. त्यांच्या सहकार्यामुळे मी चांगली कामगिरी करू शकलो. 2018 वर्ष माझ्यासाठी स्वप्नवत ठरले," अशी प्रतिक्रिया मॉड्रिचने दिली.

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी