शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

कौतुकास्पद : जर्मन फुटबॉल संघानं Corona शी मुकाबला करण्यासाठी केली २० कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 1:18 PM

जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास २ लाख १९,०३३ वर पोहोचली आहे.

जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास २ लाख १९,०३३ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे १७० हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या ८,९५३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे ८२ हजार ९०९ लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगभरात तांडव माजवणाऱ्या या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी जर्मन फुटबॉल संघानं पुढाकार घेतला आहे त्यांनी जवळपास २० कोटी रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

जर्मन फुटबॉल संघानं २.५ मिलियन युरो म्हणजेच जवळपास २० कोटी, ४४ लाख, ६१,६७४ रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ''संपूर्ण जग संकटात असताना आपण एकमेकांची काळजी घ्यायला हवी. संघातील सर्व सदस्यांनी चांगल्या कार्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे,''अशी माहिती जर्मन संघाचा कर्णधार मॅन्यूएल न्यूएर याने दिली. त्याच्यासह जोशूया किमिच, लीओन गोरेत्झ्का आणि मॅटीआस जिंटर यांनीही इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. ही मदत कोणत्या स्वरूपात असेल याची माहिती खेळाडूंनी दिली नाही.    दरम्यान, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ( NBA)मधील दी उताह जॅझ या संघातील खेळाडू रूडी गोबर्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर NBAनं सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला. रूडी सध्या कोरोना विषाणूवर उपचार घेत आहे. उपचार घेताना त्यानं या रोगातील रुग्णांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धावपळ जवळून पाहिली आणि त्यामुळेच त्यानं मोठा निर्णय घेतला. NBAच्या या स्टार खेळाडूनं कोरोना विषाणूच्या रुग्णांना बऱ्या करणाऱ्या संस्थेसाठी ५ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेत जवळपास ३ कोटी ७० लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

रूडी ही मदत Vivint Smart Home Arena आणि कोरोना विषाणूशी संबंधित समाजसेवा करणाऱ्या संस्थांना करणार आहे. फ्रान्समधील ओक्लाहोमो शहरातील उताह येथील संस्थांना त्यामुळे फार मोठी मदत मिळणार आहे. २७ वर्षीय रूडी हा कोरोना संक्रमित झालेला पहिला NBA खेळाडू ठरला. तो म्हणाला,''कोरोना विषाणूंनी संक्रमित लोकांना बरं करण्यासाठी जगभरात अनेक लोकं झटत आहेत. त्यांची न थकता काम करणारी धावपळ पाहून मी थक्क झालो. विशेषतः माझ्या शहरात उताह येथे आणि फ्रान्समध्ये या रोगाला रोखण्यासाठी झटणाऱ्या लोकांची तळमळ मी पाहत आहे. मी माझ्यापरीनं या विषाणूला रोखण्यासाठी छोटीशी मदत करत आहे.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 रद्द झाल्यास MS Dhoniसह तीन खेळाडूंना मोठा फटका!

टीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का? ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम

... तर Virat Kohli, MS Dhoni यांच्यासह अनेकांना कोट्यवधींचा भुर्दंड

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा IPL 2020 मधील सहभाग अनिश्चित, सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तान सुपर लीगमध्ये १२८ खेळाडूंची चाचणी; समोर आला अहवाल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉल