सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. दिवसभरातील तो आपला सर्वात पहिला आहार असतो. जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल तर तुम्ही स्वतःच तुमच्या आरोग्याशी हेळसांड करत आहात. आपलं शरीर सकाळी उठल्यानंतर आहाराची गरज असते. त्याची पूर्तता नाश्त्यामधून केली जाते. अनेक आहारतज्ज्ञही अनेकदा पोटभर नाश्ता करण्याचा सल्ला देत असतात. आपल्या सेक्सी आणि हॉट फिगरने अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणाऱ्या अभिनेत्री आपलं डाएट अगदी काटेकोरपणाने फॉलो करत असतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या अभिनेत्री आपल्या सकालच्या नाश्त्यासाठी कोणत्या पदार्थांची निवड करतात, याबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया बॉलिवूडच्या या अग्रगण्य अभिनेत्री आपल्या सकाळच्या पहिल्या डाएटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करतात त्याबाबत...

श्रद्धा कपूर 

'आशिकी 2' फेम श्रद्धा कपूर आपल्या खाण्या पिण्याच्या गोष्टींची फार काळजी घेते. ती आपली सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करते. ती कितीही बीझी शेड्यूलमध्ये असली तरिही ती आपल्या नाश्त्याकडे दुर्लक्षं करत नाही. तिच्या ब्रेकफास्ट प्लेटमध्ये फळं, अंडी आणि फ्रेश ज्यूस घेणं पसंत करतात. 

आलिया भट्ट 

आलिया भट्ट खाण्याची फार मोठी शौकीन आहे. पण तरिसुद्धा ती आपल्या डाएटबाबत फार कॉन्शिअस असते. आलियाच्या नाश्त्यासाठी अॅन्टी-ऑक्सिडंटयुक्त आहार घेणं पसंत करते. तसेच ती नाश्त्यामध्ये सीझनल फ्रुट्सलाही पसंती देते. ती आपल्या दिवसाची सुरुवात हर्बल टी आणि साखर नसलेल्या कॉफीने करते. यानंतर ती असं काहीतरी खाणं पसंत करते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्याप्रमाणे वाटेल. जसं की, पोहे किंवा अंड्याचं सॅन्डविच. 

शिल्‍पा शेट्टी कुंद्रा 

शिल्पा शेट्टी अनेक वर्षांपासून आपल्या स्लिम आणि ट्रिम फिगरमुळे अनेक फॅन्समध्ये नेहमीच चर्चेत असते. अनेक फॅन्स तर तिच्याप्रमाणे फिगर मिळवण्यासाठी तिच्या फिटनेस आणि डाएट टिप्स फॉलो करतात. शिल्पाने आपल्या एका इंटरव्यूमध्ये बोलताना सांगितले होते की, ती दोन भागांमध्ये सकाळचा नाश्ता घेते. सकाळी 7च्या दरम्यान ती ताजी फळं जसं केळी, सफरचंद खाणं पसंत करते. याव्यतिरिक्त ती मुसळी खाते. त्यानंतर 10च्या दरम्यान ती दोन अंडी आणि अवोकाडो खाणं पसंत करते. याशिवाय बटर टोस्टही खाते. 

करिना कपूर

बॉलिवूडमध्ये झिरो फिगर ट्रेन्ड सेट करणारी करिना कपूर आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. फिट राहण्यासाठी करिना कपूर डेली रूटिनमध्ये वर्कआउट आणि डाएटला फार महत्व देते. आपल्या एका इंटरव्यूमध्ये बोलताना करिनाने स्वतःच याबाबत सांगितले होते की, सकाळचा नाश्ता तिच्या डाएटचा सर्वात महत्वाचा भाग आहे. ती आपल्या दिवसाची सुरुवात फळांच्या सेवनाने करते. तसेच ती नाश्त्यासाठी देशी पदार्थांना फार महत्त्व देते. यामध्ये अनेकदा पराठा आणि तूप तसचे पोह्याचा समावेश असतो. 

मलायका अरोरा

करिनाप्रमाणेच बॉलिवूडची हॉट आणि सेक्सी मलायका घरात तयार केलेल्या पदार्थांना प्राधान्य देते. ती आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी, मध आणि लिंबाचा रस यांच्या एकत्रित सेवनाने करते. हे ड्रिंक त्यांना डिटॉक्स करण्यासोबतच डायड्रेट ठेवण्यासाठीही मदत करतं. मलायकाच्या नाश्त्याबाबत बोलायचं झालं तर ती सकाळी एक बाउल मिक्स फ्रुट्ससोबत पोहे, इडली, उपमा आणि मल्टीग्रेन टोस्टसोबत एग व्हाइट खाणं पसंत करते. याव्यतिरिक्त व्हेजिटेबल ज्यूस आणि स्मूदी यांचाही तिच्या लिस्टमध्ये समावेश असतो. 

दीपिका पादुकोण 

दीपिका पादुकोणचे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही अनेक फॅन्स आहेत. दीपिकाच्या सुपर टोन्ड आणि आकर्षक फिगरचं गुपित म्हणजे, घरी तयार केलेले पदार्थ. दीपिका ब्रेकफास्टमध्ये साउथ इंडियन पदार्थ म्हणजेच, उपमा, डोसा, इडली आणि पोहे यांसारखे पदार्थ खाणं पसंत करते. याव्यतिरिक्त एग व्हाइट सॅन्डविचही कधी-कधी खाणं पसंत करते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 


Web Title: Thease bollywood actresses reveal what they eat for breakfast
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.