जगभरामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक जे शरीराची गरज असते म्हणून खातात आणि दुसरे म्हणजे त्या व्यक्ती, ज्यांना आपम फूडी म्हणून ओळखतो. तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीतरी फूडी असेलच. तुमचा एखादा असा मित्र किंवा मैत्रीण जे लंचनंतरही खूप काही खाण्याची हिम्मत ठेवतात. 

जर तुमच्या आयुष्यात कोणी भुक्कड मित्र असेल, तर तुमच्याकडे एक लाख रूपये जिंकण्याची संधी आहे. महत्त्वाचं म्हणजे, एक लाख रूपये जिंकण्यासाठी तुम्हाला मेहनतीची गरज नाही. फक्त तुम्हाला 13 किलोची 'मोदी थाली' पूर्ण संपवायची आहे. 

Ardor 2.1 आणि Ardor 29 यांनी एक खास स्पर्धा स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला 13 किलोच्या मोदी थालीमध्ये असणारे 30 पदार्थ संपवायचे आहेत. पण यामध्ये एक अट आहे. तुम्हाला ही थाळी फक्त 40 मिनिटांमध्ये संपवायची आहे. मग विचार कसला करताय? सांगा तुमच्या मित्राला भन्नाट स्पर्धेबाबत... 

13 किलोंच्या या थाळीमध्ये तुम्हाला गुलाबजाम, व्हेज बिर्याणी आणि पनीर टिक्का यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवाणी मिळेल. तुम्ही नॉनव्हेज खाण्याचे शौकीन असा किंवा व्हेज खाण्याचे संधी मात्र एकदम भारी आहे. 

स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींसाठी ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला 'rdor 2.1 - Block N, CP & Ardor 29 - Sector 29, Gurgaon' या पत्त्यावर जावं लागेल. तिथे थाळी संपवून मिळालेली बक्षिसाची रक्कम घरी घेऊन जा. 

Web Title: Restaurant is offering you a cash prize of whopping rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.