Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी घरीच तयार करा तिरंगा बर्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 18:47 IST2019-01-24T18:46:23+5:302019-01-24T18:47:44+5:30
प्रत्येक सणाचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व असतं. मग तो सांस्कृतिक सण असो किंवा राष्ट्रीय सण. यादिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही वेगळं करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एखादी हटके रेसिपी तयार करू शकता.

Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी घरीच तयार करा तिरंगा बर्फी!
प्रत्येक सणाचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व असतं. मग तो सांस्कृतिक सण असो किंवा राष्ट्रीय सण. यादिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही वेगळं करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एखादी हटके रेसिपी तयार करू शकता. तुम्ही आपल्या देशाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी तिरंगा बर्फीची रेसिपी ट्राय करू शकता. ही अगदी सोपी असून तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करून शकता.
साहित्य :
- मावा - 500 ग्रॅम
- साखर - 250 ग्रॅम
- तूप - 100 ग्रॅम
- ड्रायफ्रुट्स
- नारळाचा किस
- केशरी आणि हिरवा रंग 2 ते 3 थेंब
- केशर दोन चुटकी
- चांदीचा वर्ख
कृती :
- तिरंगा बर्फी रेसिपी तयार करण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये तूप गरम करा. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स परतून घ्या.
- एका कढईमध्ये मावा परतून घ्या. त्यानंतर साखर एकत्र करून पूर्णपणे वितळेपर्यंत एकजीव करून घ्या.
- आता परतून घेतलेला मावा प्लेटमध्ये काढून घ्या आणि तीन भागांमध्ये वाटून घ्या.
- त्यानंतर माव्याच्या एका भागामध्ये हिरवा खाण्याचा रंग, दुसऱ्या भागामध्ये केशरी रंग किंवा थोडासं केशर एकत्र करा. आणि तिसरा भागामध्ये नारळाचा किस एकत्र करा.
- आता एका प्लेटमध्ये सर्वात आधी हिरव्या रंगाची माव्याची लेयर ठेवा. त्यानंतर त्यावर सफेद मावा आणि केशरी मावा पसरवून घ्या. त्यामुळे बर्फीला तिरंगा लूक मिळण्यास मदत होईल.
- त्यानंतर बारिक केलेल्या ड्रायफ्रुट्सचे तुकडे पसरवून सेट होण्यासाठी ठेवून द्या.
- तिरंगा बर्फी सेट झाल्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या आकारामध्ये तुकडे करून घ्या.
- बर्फी सेट झाल्यानंतर चांदीचा वर्ख लावून सर्व्ह करा तिरंगा बर्फी.