कुरकुरीत आणि चमचमीत 'मक्याच्या भजी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 18:53 IST2019-06-20T18:53:12+5:302019-06-20T18:53:50+5:30
पावसाळ्यामध्ये सर्वांना आवडणारा आणि खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे, भजी. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणामध्ये भजी खाण्याची मजा काही औरच....

कुरकुरीत आणि चमचमीत 'मक्याच्या भजी'
पावसाळ्यामध्ये सर्वांना आवडणारा आणि खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे, भजी. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणामध्ये भजी खाण्याची मजा काही औरच.... पण अनेकदा कांदा-बटाट्याची भजी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही नवीन भजी ट्राय करू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही ऑप्शन्स सांगणार आहोत. या पावसाळ्यात तुम्ही हेल्दी आणि हटके मक्याची भजी खाऊ शकता.
मका आणि मक्याचे दाणे वर्षभर बाजारत पहायला मिळतात. कॉलेज किंवा ऑफिसला जाणारे लोकही सकाळच्या धावपळीमध्ये नाश्त्यासाठी कॉर्नचीच निवड करतात. खरं तर मका हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात मक्याच्या भजी ट्राय करू शकता.
साहित्य :
- मक्याचे चार वाटी उकलेल्या दाण्याची पेस्ट
- 1 बटाटा उकडलेला
- ब्रेडक्रम्स
- थोडं तांदळाचे पीठ
- हिरव्या मिरच्या
- हळद
- जिरं
- मीठ
- तेल
- पाणी
कृती :
- मक्याच्या दाण्याची पेस्ट घेऊन त्यात कुस्करलेला बटाटा एकत्र करून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पिठ, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, जिरं एकत्र करून घ्यावं.
- मिश्रण व्यवस्थित एकजीव करावं.
- तयार मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करावे.
- हे गोळे ब्रेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात तळावेत.
- गरमा गरम मक्याची भजी खाण्यासाठी तयार आहेत.