शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

यंदा लोणच्याचा हंगाम मिडी उप्पीनकायीनं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 09:59 IST

Food: फेब्रुवारी महिना सुरू झाला की कर्नाटक किनारपट्टी, किनारपट्टी व घाटमाथ्याच्या मधल्या पट्ट्यात लोणचं घालायची लगबग सुरू होते.

 - साधना तिप्पनाकजे(खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)फेब्रुवारी महिना सुरू झाला की कर्नाटक किनारपट्टी, किनारपट्टी व घाटमाथ्याच्या मधल्या पट्ट्यात लोणचं घालायची लगबग सुरू होते. तुम्हाला वाटेल, फेब्रुवारीत लोणचं म्हणजे हिवाळ्याच्या अखेरच्या आवळा, लिंब, गाजराच्या लोणच्याची घाई असू शकेल; पण शिवमोगा, दक्षिण कन्नडा, उत्तर कन्नडा, उडुपी भागात कैरीच्या लोणच्याची ही लगबग असते. 

या भागामध्ये अख्ख्या बाळकैरीचं लोणचं खूप प्रसिद्ध आहे. कैरी इंचभर झाली की, तिचं लोणचं घालतात. सगळ्याच बाळकैऱ्यांचं लोणचं करत नाहीत. लोणच्याकरताची झाडं ठरलेली असतात. अनुभवातून ती हेरली जातात. या बाळकैऱ्यांच्या लोणच्याला कन्नडामध्ये मिडी उप्पीनकायी म्हणतात. मिडी म्हणजे बाळकैरी आणि उप्पीनकायी म्हणजे लोणचं. बरं या उप्पीनकायी शब्दाची फोड आणि अर्थ काय तर मीठात मुरवलेलं कच्चं किंवा कोवळं फळ. तुम्हाला आता लक्षात आलं असेलच मिठाला उप्पू म्हणतात. तर या उप्पीनकायीत तेल अजिबातच नसतं. हो अगदी बरोबर वाचलंत. हे लोणचं बिनातेलाचं असतं. 

आपल्याला तेलाचा तवंग असलेला लोणच्याचा खार पाहायची सवय आहे; पण या उप्पीनकायीत कणभरही तेल नसतं. मग हे लोणचं टिकतं कसं? - त्याच्या नावातच आहे बघा. या कैऱ्या जाड किंवा खड्या मिठात मुरवतात. मीठ अगदी आतवर मुरलं की बाळकैरीला सुरकुत्या येतात. मग त्यात लोणच्याचा मसाला घालतात. मिठात चांगलं मुरलेलं मिडी उप्पीनकायी दोन वर्षे आरामात टिकतं. सर्व लोणच्यांच्या नियमानुसार हवा आणि उजेडाचा थेट संपर्क येऊ द्यायचा नाही. लागेल तसं मोठ्या बरणीतून रोजच्या खाण्याकरता थोडं थोडं काढायचं. लोणच्याचा मसालाही अगदी साधासुधाच. मोहरी, तिखट, हळद एवढेच जिन्नस यात असतात. मिठातलं मुरणं आणि बाळकैरीची स्वतःची चव या उप्पीनकायीचा युएसपी आहे. शिवमोगामधलं आप्पे मिडी उप्पीनकायी खूप प्रसिद्ध आहे. 

शिवमोगातल्या कैरीची ही आप्पे प्रजाती अर्धा इंचाची झाली की, तिचं लोणचं घालतात. आप्पेमिडीतल्या बाळकैरीची धरू लागलेली कोवळी कोयही सुंदर लागते. तर मंडळी, फेब्रुवारी सुरू झाला आहे. बाजारात बाळकैऱ्या मिळू लागल्या आहेत. तुम्हाला लोणची आवडत असतील तर यंदाच्या लोणच्याचा हंगाम मिडी उप्पीनकायीनं सुरू करा!(sadhanasudhakart@gmail.com)

टॅग्स :foodअन्न