शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

'या' 6 पद्धतींनी ओट्स खाल तर फिट अन् हेल्दी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 1:10 PM

ओट्सचं नाव ऐकताच अनेकांची भूकचं पळून जाते. कारण या लोकांना ओट्सची चव आवडत नाही. परंतु, ओट्स जर योग्य पद्धतीने शिजवले तर हे चवीला उत्तम लागतातच पण वजन कमी करण्यासाठीही हे मदत करतात.

ओट्सचं नाव ऐकताच अनेकांची भूकचं पळून जाते. कारण या लोकांना ओट्सची चव आवडत नाही. परंतु, ओट्स जर योग्य पद्धतीने शिजवले तर हे चवीला उत्तम लागतातच पण वजन कमी करण्यासाठीही हे मदत करतात. अनेकजण नाश्त्यासाठी ओट्सचा आधार घेतात. ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश केल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते. ओट्स ग्लुटेन फ्री असतात आणि यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट्स आणि मुबलक प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे हे आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.

ओट्स अनेक प्रकारे खाता येतात. तुम्हीही एकाच प्रकारे तयार करण्यात आलेले ओट्स खाऊन कंटाळला असाल तर आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगणार आहोत. याप्रकारे ओट्स तयार केले तर ते चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. 

1. ओट्स सीझनल फ्रुट्ससोबत एकत्र करून ते ओट्स अॅन्ड फ्रुट्स शेक म्हणून पिऊ शकता. यामध्ये तुम्ही दूधही एकत्र करू शकता. 

2. ओट्स विविध प्रकारच्या भाज्यांसोबत एकत्र करून तयार केलं जाऊ शकतं. यामध्ये तुम्ही गाजर, वाटाणे, कोबी, फरसबी किंवा पालक यांसारख्या भाज्यांचा वापर करू शकता.

3. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर बाजारात मिळणाऱ्या पॅकेट असणाऱ्या ओट्सऐवजी प्लेन ओट्स खा. साधारणतः पॅकेट असणाऱ्या ओट्समध्ये साखर असते. त्यामुळे शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढते. 

4. ओट्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. फायबरमुळे पोट दिर्घकाळ भरल्याप्रणाणे वाटते, त्यामुळे जास्त भूक लागत नाही. तसेच वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. फायबर वेट लॉससाठी एक अत्यंत फायदेशीर तत्व आहे. 

5. वेट लॉससाठी फायबरसोबतच प्रोटिन्सची गरज असते. त्यामुळे ओट्समध्ये एग व्हाइट म्हणजेच, अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून टेस्टी डिश तयार करू शकता. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कॅलरी बर्न करणं सहज शक्य होतं. 

6. ओट्सपासून तयार करण्यात आलेली खिचडी चवीला स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही पौष्टिक असते. यामध्ये तुम्ही चण्याची डाळ, उदडाची डाळ आणि काही भाज्या एकत्र करून खिचडी तयार करू शकता. त्याचबरोबर शुद्ध तूप आणि हिंगाची फोडणी दिली तर खिचडी आणखी स्वादिष्ट होण्यास मदत होते. 

ओट्समध्ये बीटा-ग्लूकोन फायबर आढळून येतं, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. तसेच शरीराला आवश्यक असणारी इतरही पोषक तत्व ओट्समुळे शरीराला मिळतात. याव्यतिरिक्त ओट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल एडीएल जमा होऊ देत नाही आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत करतं. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स