फ्रोजन मटार खाणं तब्येतीसाठी घातक की चांगलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती हवंच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:15 IST2026-02-05T09:42:22+5:302026-02-05T18:15:26+5:30

Green Peas and Frozen Peas Difference : ऋतू संपताच ताजी मटार मिळेनाशी होते आणि तेव्हा अनेक जण फ्रोजन मटार वापरतात. मात्र, फ्रोजन मटार आरोग्यासाठी चांगली आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो.

How different are frozen peas from fresh peas? Is it safe or not to eat them? | फ्रोजन मटार खाणं तब्येतीसाठी घातक की चांगलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती हवंच..

फ्रोजन मटार खाणं तब्येतीसाठी घातक की चांगलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती हवंच..

Green Peas and Frozen Peas Difference : हिवाळ्यात बाजारात वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्यांसोबतच ताजी हिरवी मटार मुबलक प्रमाणात मिळते. मटार जवळपास सगळ्यांनाच आवडते. कुणी कच्चे मटार खातात, तर कुणी भाजून. वेगवेगळ्या भाज्या - पदार्थांमध्ये सर्रासपणे मटारचा वापर केला जातो. याने टेस्टही वाढते. पण ऋतू संपताच ताजी मटार मिळेनाशी होते आणि तेव्हा अनेक जण फ्रोजन मटार वापरतात. वेगवेगळ्या स्टोरमध्ये फ्रोजन मटार सहज उपलब्ध असते. मात्र, फ्रोजन मटार आरोग्यासाठी चांगली आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो.

मटार – प्रथिने आणि पोषणाचा चांगला स्रोत

हिरवी मटार ही शाकाहारी लोकांसाठी उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे. त्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजेही भरपूर असतात. त्यामुळे हिवाळा संपल्यानंतरही फ्रोजन मटारचा वापर केला जातो.

फ्रोजन मटार कशी तयार होते?

पूर्णपणे पिकलेली मटार तोडून ती साधारण –१८ अंश सेल्सिअस तापमानावर फ्रीज केली जाते. इतक्या कमी तापमानामुळे जंतुसंसर्ग किंवा जैविक बदल होत नाहीत आणि मटार दीर्घकाळ खराब होत नाही.

फ्रोजन मटार अपायकारक आहे का?

अनेकांना वाटते की फ्रोजन मटार आरोग्यासाठी हानिकारक असते, पण तज्ज्ञ हे मत चुकीचं मानतात. न्यूट्रिशनिस्ट्सच्या मते, फ्रोजन मटारमध्येही ताजी मटारइतकीच प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

फ्रेश आणि फ्रोजन मटारमध्ये पोषणाचा फरक आहे का?

संशोधनानुसार, ताजी आणि फ्रोजन मटारच्या पोषणमूल्यांमध्ये फारसा फरक नसतो. अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की फ्रोजन भाज्याही ताज्या भाज्यांइतक्याच पौष्टिक असतात.

प्रिझर्वेटिव्हबाबत गैरसमज

फ्रोजन मटारमध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्ह घातले जातात, असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात –१८°C तापमानावर फ्रीज केल्यामुळेच मटार सुरक्षित राहते; वेगळ्या प्रिझर्वेटिव्हची गरज नसते. मात्र, चवीत थोडा फरक जाणवू शकतो.

Web Title : ताज़ी बनाम फ्रोजन मटर: क्या फ्रोजन मटर स्वस्थ और अलग है?

Web Summary : फ्रोजन मटर ताज़ी मटर के समान पोषक तत्वों को बरकरार रखती है। फ्रीजिंग उन्हें रसायनों के बिना संरक्षित करती है। ताज़ी मटर उपलब्ध न होने पर फ्रोजन मटर को स्वस्थ विकल्प के रूप में लें।

Web Title : Fresh vs. Frozen Peas: Are Frozen Peas Healthy and Different?

Web Summary : Frozen peas retain nutrients similar to fresh ones. Freezing preserves them without chemicals. Enjoy frozen peas as a healthy, convenient option when fresh ones aren't available.