Health Tips : health benefits eating soaked peanuts water | रोज भिजवलेले शेंगदाणे खाल्यानं टळेल 'या' आजारांचा धोका; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

रोज भिजवलेले शेंगदाणे खाल्यानं टळेल 'या' आजारांचा धोका; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

कोरोनाकाळात अनेक आजारांबाबत लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.  कोरोनाशीच नाही वातावरणातील बदलांमुळे उद्भवत असलेल्या इतर आजारांपासून दूर राहण्यासाठी विशेष काळजी  घेणं गरजेचं आहे. रोजच्या आहारात तुम्ही काही गोष्टींचा समावेश केला तर  रोगप्रतिकारकशक्ती वाढून आजारांपासून लांब राहू शकता. शेंगदाणे हा पदार्थ सगळयांच्याच स्वयंपाकघरात असतो. आपण शेंगदाण्यांचा वापर जेवणात करतच असतो. पण रोज सकाळी उठून  भिजवलेले शेंगदाणे खाल तर अनेक फायदे मिळतील. गंभीर आजार नसेल तरी रोज गॅस, एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवत असतात. वारंवार उद्भवत असल्यातरी आपण या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे सांगणार आहोत. 

मेंदूसाठी फायदेशीर

ज्याप्रमाणे ड्राय फ्रुट्सचे सेवन करणं शरीरासाठी लाभदायक ठरतं. त्याप्रमाणेच शेंगदाणे सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. या फॅटी एसिड्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून सकाळी लवकर उठून अभ्यास करत असलेल्या मुलांना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. 

हद्याच्या आजारांपासून लांब  राहता येतं

शेंगदाण्यांमध्ये अनेक प्रभावी गुण असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. एका रिसर्चनुसार शेंगदाण्यांमध्ये कार्डियोप्रोटेक्टिव गुण  असतात. कार्डियोप्रोटेक्टिव गुणांमुळे हृदयाच्या रोगांपासून लांब राहता येतं. 

व्यायाम करत असाल तर 

जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर सकाळी उठल्यानंतर शेंगदाण्यांचे सेवन फायदेशीर ठरेल. यात मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात.  जर तुम्हाला आपली शरीरयष्टी आकर्षक बनवायची असेल तर  सकाळी उठून शेंगदाण्यांचे सेवन करा. जेणेकरून तुम्ही व्यायाम करताना जास्त स्ट्रेंन्थ वापरू शकता. दूध आणि अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन शेंगदाण्यामध्ये असतात. हे पाण्यात भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते. शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यामधील न्यूट्रिएंट्स शरीरात पूर्णपणे अब्जॉर्ब होतात.

पोट साफ होण्यास मदत 

 भिजवलेल्या शेंगदाण्याच्या सेवनाने गॅस, पोट साफ  न होण्याची समस्या दूर होते. कारण शेंगदाण्यात डाएटरी फायबर्स असतात. त्यामुळे सतत लॉकडाऊनमध्ये पोट साफ होण्यास त्रास होत असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर शेंगदाण्याचे सेवन करा. यामुळे तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

हे पण वाचा :

२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या

अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

Web Title: Health Tips : health benefits eating soaked peanuts water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.