काजू खाऊन त्वचा, डोळ्यांच्या विकारासह मोठ्या आजारांपासून राहता येईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 11:25 IST2020-02-03T11:18:15+5:302020-02-03T11:25:23+5:30
सगळ्यांच्या घरी गोडाचे काही पदार्थ तयार करत असताना ड्रायफ्रुट्सचा वापर केला जातो.

काजू खाऊन त्वचा, डोळ्यांच्या विकारासह मोठ्या आजारांपासून राहता येईल दूर
सगळ्यांच्या घरी गोडाचे काही पदार्थ तयार करत असताना ड्रायफ्रुट्सचा वापर केला जातो. तसंच काहीजण रोजचं शरीराला पोषण मिळण्यासाठी ड्रायफ्रुट्स खात असतात. त्यातील एक आणि सगळ्यांचाच आवडता असलेले पदार्थ म्हणजे काजू. अनेकजण वजन वाढेल म्हणून काजू खात नाही. तर काहीजणांना दिवस उगवल्यानंतर सगळ्यात आधी काजू खायचे असतात. आज आम्ही तुम्हाला काजू खाण्याचे फायदे सांगणार आहोत. असे फायदे जे तुम्हाला कधी माहितही नसतील काजूचे सेवन केल्यामुळे शरीराला पोषण मिळण्यासोबतच आरोग्य सुद्धा चांगले राहते.
अनेकांच्या घरी ओल्या काजूंची भाजी सुद्धा तयार केली जाते. या काजूंची भाजी खूपच चविष्ट लागते. अनेक पदार्थांना चव येण्यासाठी काजूची भाजी तयार केली जाते. शरीराला उर्जा देण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक यात असतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत काजूच्या सेवनाचे फायदे.
ताण-तणाव दूर करण्यासाठी
मासिक पाळीत मुड चांगला ठेवण्यासाठी डिप्रेशनवर देखील काजू उत्तम उपाय आहे. मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या मुडस्विंग्सच्या वेळी देखील काजू खाल्याने चांगला फायदा होतो. काजूत आर्यन आणि ओमेगा 3 चे प्रमाण अधिक असल्यामुळे मूड चांगला ठेवण्यात काजू अधिक फायदेशीर आहे. काजूंमध्ये व्हिटामीन बी आणि मोठ्या प्रमाणावर एन्टी ऑक्सीडंन्टस असतात. जे मेंदूसोबच त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे ताण-तणावापासून लांब राहता येतं.
डोकेदुखीच्या समस्येवर उपाय
काजू खाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. कारण सध्याच्या काळात आपण बघतो की ताण-तणावामुळे रोजच्या आयुष्यातील समस्यांचा डोंगर असतो. अशा परिस्थितीत डोकेदूखीची समस्या सर्वाधीक लोकांना जाणवत असते. काजूत असणाऱ्या एनर्जीमुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तो कमी होतो.
त्वचेसाठी फायदेशीर
काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळते. काजू तेलकट, शुष्क इत्यादी प्रत्येक प्रकरच्या त्वचेसाठी लाभदायक आहे. त्वचा तेलकट असल्यास काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवावेत. सकाळी बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किवा थोडे दही मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.
डोळ्यांसाठी उत्तम
काजूमध्ये असलेले एन्टीऑक्सीटडंट्स आणि लुटेन हे घटक डोळ्यांचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काजू फायदेशीर ठरत असतो. ( हे पण वाचा-लूज मोशनमुळे सतत टॉयलेटच्या फेऱ्या मारून वैतागलात? 'या' घरगुती उपायांनी मोशन झटपट होईल दूर...)
मोठ्या आजारांपासून होतो बचाव
काजूचं सेवन केल्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरत नाहीत. त्यामुळे लिव्हर कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सारखे आजार आपल्यापासून दूर राहतात. डायबिटीस, रक्तदाब, लठ्ठपणा यावर काजू फायदेशीर ठरतात. यात प्रोटीन आणि व्हिटामिनचं प्रमाण देखील जास्त आहे. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी उपयोगी असतं. तसेच काजू खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ( हे पण वाचा-रिकाम्या पोटी पेरू खाल्याने पोट साफ होण्यासह मिळेल 'या' गंभीर आजारांपासून सुटका!)