लूज मोशनमुळे सतत टॉयलेटच्या फेऱ्या मारून वैतागलात? 'या' घरगुती उपायांनी मोशन झटपट होईल दूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 11:04 AM2020-02-03T11:04:11+5:302020-02-03T11:04:50+5:30

वीकेंडला मित्रांसोबत पार्टी करण्याची आवड सगळ्यांना असते. पण कधी कधी बाहेर काही चटरबटर खाऊन अनेकदा लूज मोशन सुरू होतात आणि मग सगळंच जागेवर बसतं.

Home remedies for loose motion will help | लूज मोशनमुळे सतत टॉयलेटच्या फेऱ्या मारून वैतागलात? 'या' घरगुती उपायांनी मोशन झटपट होईल दूर...

लूज मोशनमुळे सतत टॉयलेटच्या फेऱ्या मारून वैतागलात? 'या' घरगुती उपायांनी मोशन झटपट होईल दूर...

googlenewsNext

वीकेंडला मित्रांसोबत पार्टी करण्याची आवड सगळ्यांना असते. पण कधी कधी बाहेर काही चटरबटर खाऊन अनेकदा लूज मोशन सुरू होतात आणि मग सगळंच जागेवर बसतं. अनेक बाहेरचं काही खाऊन पोट बिघडतं आणि मग टॉयलेटमध्ये दिवसभर ये-जा सुरू राहते. ना कशात लक्ष लागत नाही काही काम होत. या समस्येला मेडिकल भाषेत डायरिया असंही म्हणतात.

काय असतात कारणे

(Image Credit : mavcure.com)

लूज मोशन एक अशी समस्या आहे जी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होते. जर एखादी व्यक्ती दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळ टॉयलेटला जात असेल तर या स्थितीला लूज मोशन किंवा डायरियाची स्थिती मानलं जातं. यादरम्यान सर्वात अडचणीची गोष्ट म्हणजे शरीरातून प्रमाणापेक्षा जास्त पाणी निघत असल्याने व्यक्तीला कमजोरी जाणवते. चला जाणून घेऊ याची कारणे....

- व्हायरल इन्फेक्शन

- बॅक्टेरिअल इन्फेक्शन

- एखादा पदार्थ खाऊन अ‍ॅलर्जी झाल्याने 

- फूड पॉयजनिंग

- काही खाल्ल्याने किंवा प्यायल्याने इन्फेक्शन झाल्यास.

- स्ट्रेस

- दुषित पाण्याचं सेवन केल्याने

औषध न घेता कसा कराल उपाय

लूज मोशन वर सांगण्यात आलेल्या कारणांचं एक लक्षण आहे. ज्यामुळे लूज मोशन जास्त वेळा फार सिरीअस नसतं. यावर घरीच सहजपणे उपाय करता येतात. महत्वाची बाब म्हणजे याचे काही साइड इफेक्ट्सही होत नाहीत. या घरगुती उपायांनी तुम्हाला दोन दिवसात बरं वाटू शकतं.

इलेक्ट्रॉल किंवा साखर-मिठाचं पाणी

लूज मोशल किंवा डायरिया झाल्यावर शरीरातून पाण्यासोबत गरजेचे मिनरल्सही बाहेर निघतात. त्यामुळे अचानक कमजोरी येऊ लागते आणि तुम्हाला सतत बेडवर पडून रहावं लागतं. अशात शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं राहतं नाही तर डिहायड्रेशनची समस्या होते. यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी सेवन करा. जर घरात इलेक्ट्रॉल पावडर नसेल तर एक ग्लास पाण्यात १ चमचा साखर, चिमुटभर मिठ टाकून मिश्रण तयार करा. हे पाणी दिवसभर थोडं थोडं सेवन करा.

दही फायदेशीर ठरतं

जेव्हा लूज मोशनची समस्या होते तेव्हा दही सुद्धा रामबाण उपाय मानला जातो. कारण यात प्रोबायॉटिक भरपूर प्रमाणात असतात. प्रोबायॉटिक बॅक्टेरिया शरीरातील इन्फेक्टेड बॅक्टेरियाशी लढून त्यांना शरीरातून बाहेर करतात. ज्यामुळे डायरियाची समस्या दूर होते. 

केळी आणि बटाटाही फायदेशीर

प्रोबायॉटिकशिवाय आणखी एक उपाय म्हणजे पोटॅशिअम. पोटॅशिअम असलेल्या फळांनी लूज मोशनची समस्या दूर होते. यासाठी केळी आणि बटाट्याचं सेवन करू शकता. केळ्यात पोटॅशिअमसोबतच इलेक्ट्रोलाइट्सही असतात ज्याने लूज मोशनमुळे शरीराला होणारं नुकसान कमी केलं जातं. तसेच केळ्याने आवश्यक एनर्जी सुद्धा मिळते. त्यासोबतच बटाटा सुद्धा लूज मोशनमध्ये फायदेशीर ठरतो. एक बटाटा उकडून त्यात संवैध मिठ घाला आणि खा. 

काय टाळावे

लूज मोशन झाल्यावर काय खावे किंवा प्यावे हे तर तुम्हाला माहीत आहे. पण या स्थितीत कोणत्या गोष्टी टाळाव्या हेही माहीत असलं पाहिजे. 

-फायबर असलेली फळं आणि पदार्थ टाळावेत

- सफरचंद, आलुबुखारा, जांभळं अशी फळे खाऊ नये

- दूध आणि डेअरी प्रॉडक्ट्सचं सेवन करू नका

- पनीर, चीजही खाऊ नका


Web Title: Home remedies for loose motion will help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.