रिकाम्या पोटी पेरू खाल्याने पोट साफ होण्यासह मिळेल 'या' गंभीर आजारांपासून सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 03:07 PM2020-02-02T15:07:05+5:302020-02-02T15:18:59+5:30

हिवाळ्यात पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध लाल पांढरे पेरू खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होत असते.

know the benefits of eating guava in empty stomach | रिकाम्या पोटी पेरू खाल्याने पोट साफ होण्यासह मिळेल 'या' गंभीर आजारांपासून सुटका!

रिकाम्या पोटी पेरू खाल्याने पोट साफ होण्यासह मिळेल 'या' गंभीर आजारांपासून सुटका!

googlenewsNext

हिवाळ्यात पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.  पेरू खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होत असते. पेरूचे अनेक फायदे आपल्याला माहित असतात. पण अनेकजण पेरू या फळात असलेल्या बीयांमुळे स्टोन होईल किंवा दातांच्या दुखण्याचा त्रास होईल असा विचार करून पेरूचं सेवन टाळतात. आत्तापर्यंत तुम्हाला पिकलेल्या पेरूचे फायदे माहित असतील पण कच्च्या पेरूचे सुद्धा अनेक फायदे आहेत ते तुम्हाला माहितही नसतील.

अनेकांच्या घरी पेरूची झाडं सुद्धा असतात. व्हिटामीन्स आणि मिनरल्सचे प्रमुख स्त्रोत असलेले पेरू हे फळं आहे. तसंच पेरूच्या सेवनाने  शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अनेक आजारांपासून बचाव होण्यासाठी पेरूचा आहारात समावेश करावा. अनेक पोषक घटक पेरू या फळात असतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत पेरूच्या सेवनाचे फायदे.

मलावरोधाचा त्रास होत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरूचे सेवन करावे. यामुळे आतडय़ांची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होते. तसंच तोंडाचा अल्सर बरा करण्यासाठी कच्चा पेरू उपयुक्त ठरत असतो.

पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार, हिरडय़ांची सूज व मुख विकार दूर होतात.

सकाळी सकाळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खाणे खूप फायद्याचे ठरते. जर तुमच्या तोंडातून वास येत असेल तर पेरूचे पानं चावल्यास फायदेशीर ठरते. 

पेरूच्या पानांना वाटून त्याचे पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट डोळ्यांच्या खाली लावायची. यामुळे डोळ्यांचा खाली असणारे काळे डाग व सूज कमी होते.

मधूमेह, मोतीबिंदू, खोकला, हद्यविकाराच्या आणि वजन कमी होण्याच्या समस्येसाठी पेरूचे सेवन उपयुक्त ठरत असते. पेरू  कॉलेस्ट्रॉल कमी करून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून वाचवतो. ( हे पण वाचा-ऑफिस किंवा घरी कुठेही पोट फुगण्याला जबाबदार ५ कारणे, वेळीच बदला 'या' सवयी!)

पेरूच्या बिया चावून-चावून खाल्ल्याने त्या शरिरातील लोहाच्या कमतरता भरून काढतात. पेरूमध्ये असलेल्या लायकोपीन या घटकामुळे  कॅन्सर आणि ट्यूमरचा आजार होण्यापासून बचाव करता येऊ शकतो. (हे पण वाचा-वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याआधीच व्हा सावध, काय आहेत लक्षणं आणि उपाय)

Web Title: know the benefits of eating guava in empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.